Citizens respond positively to the administration during Ganeshotsav on the backdrop of Corona says collector nashik marathi news 
नाशिक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात नागरिकांचा प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद  : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

प्रशांत कोतकर

नाशिक : शतकोत्तर वर्षांची परंपरा लाभलेला गणेशोत्सव गणरायांच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणूकांच्या माध्यमातून दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येतो. परंतू यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत गर्दी टाळण्याच्या हेतून मिरवणूकांवर निर्बंध घालण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या सोशल डिस्टसिंगच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या आवाहनाला गणेशोत्सवात व विसर्जनात सामान्य नागरिकांनी व सार्वजनिक गणेशमंडळांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे यंदाच्या गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. याअनुषंगाने यंदाचा गणेशोत्सव व विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी महसूल, पोलिस यंत्रणा व जिल्हा प्रशासनाच्या विविध कार्यालयांचे योगदान महत्वाचे ठरले आहे, असे जिल्हाधिकार सूरज मांढरे यांनी सांगितले आहे. 

स्वागत आणि विसर्जन निर्विघ्नपणे पार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनामार्फत ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहून गणेशोत्सवाचा कालावधी साजरा करण्यात आल्याने जिल्ह्यात अगदी तुरळक घटना सोडल्यास सर्वत्र श्रीगणेशाचे स्वागत आणि विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले आहे. गणेश विसर्जन सुरळीतरित्या पार पडावे यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनामार्फत कृत्रिम व नैसर्गिक तळ्यांची निर्मीती करण्यात आली होती; तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मुर्तीदान केंद्रांची उभारणी देखील करण्यात आली होती. विसर्जना दरम्यान नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांमुळे नागरिकांचा उत्साह देखील कमी झाला नसल्याचे जिल्हाधिकारी  मांढरे यांनी सांगितले आहे.


गणेशोत्सावात नागरिक व गणेश मंडळांनी जपले जबाबदारीचे भान

यंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना गर्दी टाळणे, सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करणे, सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीगणेशाच्या आगमन व विर्सजनाच्या मिरवणूका न काढणे तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये नियमित निर्जंतुकीकरण करून थर्मल स्कॅनिगची पर्याप्त व्यवस्था करणे, मंडळातील श्रीगणेश मूर्ती चार फुट तर घरातील मुर्ती दोन फूटांपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात, गणेशमुर्ती ह्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या असाव्यात किंवा घरातील धातूच्या, संगमरवरच्या श्रीगणेशमुर्तींचे पुजन करावे. तसेच सार्वजनिक गणेशमंडळांनी गर्दी होईल अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न करता आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिर, स्वच्छता आदी विषयांबाबत जनजागृती करावी. आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम साजरे करतांना ध्वनीप्रदुषण होणार नाही याबाबत सर्वच मंडळांकडून दक्षता घेण्यात आली आहे. सर्वांना गणेशाचे दर्शन घरच्या घरी घेता यावे आणि मुख्य म्हणजे गर्दी टाळावी यासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक यांच्या माध्यमातून श्रीगणेश दर्शानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रशासनाला यामुळे खूप सहकार्य झाले आहे.
शासनामार्फत करण्यात आलेल्या आवाहनाला सामान्य नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळांकडुन सामाजिक जबाबदारीचे भान जपत अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती  ही जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

तालुका स्तरावरील गणेशोत्सव

नाशिक शहरात सार्वजनिक व खाजगी मिळून 68 हजार 689 गणपतींची स्थापना करण्यात आली होती. विसर्जनाच्या दरम्यान देवळाली वालदेवी येथे एक व दारणा नदीत एक अशा दोन व्यक्तींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. तर इतर सर्वत्र गणेशोत्सव कालावधी व विसर्जन सुरळीत पार पडले आहे. इगतपुरी येथे विसर्जना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून विसर्जन सुरळीत पार पडले आहे. त्र्यंबकेश्वर येथे एक गाव एक गणपती उपक्रमाअंतर्गत 11 व सार्वजनिक ठिकाणी  8 अशा गणपतींचे विसर्जन झाले असून पाझर तलावात पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पेठ तालुक्यात एक गाव एक गणपती 44 तर सार्वजनिक 4 गणपतींचे विसर्जन झाले यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. सुरगाणा पोलिस स्टेशनअंतर्गत नोंद झालेल्या आठ गणपतींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडलेले आहे. दिंडोरी व कळवण तालुक्यात सार्वजनिक गणपती नसल्याने तेथे ही विसर्जन दरम्यान अनुचित घटना घडलेली नाही. बागलाण तालुक्यात नऊ गणपतींचे विसर्जन अनुचित घटना न घडता निर्विघ्नपणे पार पडले आहे. देवळा तालुक्यात 18 गणेशांचे विसर्जन करण्यात आले. त्यावेळी एका व्यक्तीचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चांदवड पोलिस स्टेशनअंतर्गत 10 गणपतीं, मालेगाव येथे 231 गणपती, नांदगाव येथे 6 तर मनमाड पोलिस स्टेशन अंतर्गत 41, येवला ग्रामीण पोलिस स्टेशन 18 तर शहर पोलिस स्टेशन येथे नोंद झालेल्या 29 गणेशांचे विसर्जन कोणतीही अनुचित घटना न घडता पार पडले आहे. निफाड येथे 18 गणपतींचे विसर्जन पार पडले परंतू यादरम्यान कादवा नदीपात्रात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच सिन्नर शहर व ग्रामीण भागात एकही सार्वजनिक गणपती नसून, खाजगी गणपतींच्या विसर्जनाच्या वेळी एका मुलाचा म्हाळुंगी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे.‍ गणेशाच्या मूर्तीदानासाठी 19 ठिकाणी केंद्र उभारण्यात आले होते.

गणपती विसर्जनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची भूमिका

जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच इतर आपत्तीच्या परिस्थितीत NDRF अथवा SDRF या पथकांना पाचारण करावे लागते, या पथकांना घटनास्थळी पोहचण्यासाठी काही तासांचा कालावधी लागत असल्याने अत्यावश्यक सेवा लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून 150 स्वयंसेवकांना NDRF द्वारे बोट चालविणे, पोहणे, शोध व बचाव कार्य  या प्रकारचे प्रशिक्षण  देण्यात आले आहे. याच प्रशिक्षणाचा उपयोग गणेश विसर्जनच्या वेळी होणाऱ्या दुर्दैवी घटना घडू नये यासाठी झाला आहे. प्रशासनाने याबाबत दक्षता घेवून सुद्धा 6 व्यक्तींचा गणपती विसर्जनात  निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे.

एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्यात तुरळक दुर्दैवी घटना सोडल्यास कोरोना विषाणूच्या संकटकाळात देखील नागरिकांच्या, सार्वजनिक गणेशमंडळाच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे विघ्नहर्त्या बाप्पाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT