vaccine esakal
नाशिक

नाशिकमध्ये लसीसाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा

अरूण मलाणी

नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona virus) मोहीम राबविली जात असताना, अनेक केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्‍याने आरोग्‍याच्‍या अन्य इतर समस्‍या निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. अशात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होत आहे. विकेंद्रीकरण करताना खासगी रुग्‍णालयांमधील केंद्रांची संख्यादेखील वाढविण्याची वेळ आली आहे. तसेच गर्दीचे व्‍यवस्‍थापन करण्यासाठी आणखी उपाययोजना करण्याचीही गरज निर्माण झाली आहे. (Citizens-wait-for-hours-for-vaccine-in-Nashik-marathi-news)

ग्रामीण भागाला मोठा फटका

कोरोना दुसऱ्या लाटेत शहरासह ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. त्यातच कोरोनाची संभाव्‍य तिसऱ्या लाटेची शक्‍यता लक्षात घेता लसीकरण करून घेण्यावर नागरिकांचा भर आहे. नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी प्रशासकीय यंत्रणेची चिंता वाढविणारी ठरू लागली आहे. राज्‍यातील विविध भागांमध्ये जमावात झालेल्‍या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्‍याचे बघायला मिळाले आहे. तशीच स्‍थिती नाशिकला कुठल्‍याही क्षणी उद्भवण्याची भीती व्‍यक्‍त होत आहे. अशात तातडीने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

खासगी रुग्‍णालयांच्‍या संख्येत करावी वाढ

दुसऱ्या लाटेत सुमारे ऐंशी टक्‍के रुग्‍णांवर खासगी रुग्‍णालयांतून उपचार करण्यात आले होते. अशात लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी खासगी रुग्‍णालयांची मदत घेणे अपरिहार्य आहे. सध्या मोजक्याच खासगी रुग्‍णालयांमधून लसीकरण केले जात आहे. शासकीय लसीकरण केंद्राप्रमाणे खासगी रुग्‍णालयांतील लसीकरण केंद्रांच्‍या संख्येत वाढ करण्याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी रुग्‍णालयांना लशींचा पुरवठा होण्यासाठी सहाय्यता करण्यासह अन्‍य विविध स्वरूपाची मदत करण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होते आहे.

अशा आहेत सूचना..

* ड्राईव्‍ह इन व्‍हॅक्‍सिनेशन सेंटरद्वारे गर्दी विभाजन शक्‍य

* लसीकरण केंद्रांच्‍या संख्येत करावी लागेल वाढ

* ज्‍येष्ठ नागरिक व अन्‍य वयोगटातील व्यक्तीला स्‍वतंत्र सत्र ठेवावे.

* वयोगटानुसार नोंदणी प्रक्रियेसाठी वेगळे काऊंटर ठेवावे.

* मोहिमेत खंड पडू न देता, सातत्‍य राखले जावे.

* तुटवडा असल्‍यास महापालिका प्रशासनाने

त्‍यांच्‍या स्‍तरावर करावी लसीकरण खरेदी

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत होणाऱ्या गर्दीमुळे आरोग्‍याच्‍या अन्य इतर समस्‍यांचा धोका वाढला आहे. लसीकरण केंद्रांची संख्या तातडीने वाढविण्याची गरज आहे. अन्‍य व्‍यवस्‍थापनातही सुधारणा अपेक्षित आहे. आयएमए, खासगी रुग्‍णालये प्रशासनाच्‍या मदतीसाठी तत्‍पर आहोत. -डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT