Nashik Bribe Crime News esakal
नाशिक

नाशिक : शहर तलाठ्याला लाच घेताना अटक

संजीव निकम

नांदगाव (जि. नाशिक) : शेतजमिनीच्या सातबारा (farm field satbara) उताऱ्यावर वारसाचे नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच (Bribe) मागणाऱ्या नांदगाव येथील शहर तलाठी युवराज मासाळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Bribery Department) मुद्देमालासह पकडले. (City Talathi arrested for taking bribe Nashik Crime News)

तक्रारदाराने नांदगाव येथील तलाठी युवराज मासाळे यांच्याकडे शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, तलाठी मासाळे यांनी यासाठी त्यांच्याकडे पाच हजारांची मागणी केली व दोन हजार रुपये आगाऊ देण्याचे ठरले. तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी (ता. १३) दुपारी तीनला जुन्या तहसील कार्यालयातील तलाठी कार्यालयात नाशिक येथील पथकाने सापळा रचून तलाठी मासाळे यांना दोन हजारांची लाच घेताना पकडले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र पवार, हवालदार प्रकाश डोंगरे, पोलिस नाईक प्रणय इंगळे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: शरद पवार 'जंतरमंतर'वर! अभिजित दीपकेंची घेतली भेट; आंदोलक आक्रमक, म्हणाले...

सोनम, सर उपोषण थांबवा! तुम्ही आणि विद्यार्थी देशाच्या भविष्यासाठी लढताय... माझा तुम्हाला फुल सपोर्ट; IPL संघ मालकिणीची पोस्ट व्हायरल

Live Updates Marathi : कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्तेपदावरून विजेता दहियांना हटवलं, कारण काय?

Mumbai: पाच वर्षांत ६,५०० मेगावॉट विजेची गरज, मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, डेटा सेंटरचा थेट परिणाम

धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानाजवळ आंदोलन | CJP Andolan

SCROLL FOR NEXT