Citylinc news esakal
नाशिक

Citylinc Fare Hike News : नववर्षाच्या सुरवातीला शहर बस दरात एवढी वाढ होणार! जाणुन घ्या

विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीकडून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहर बस वाहतुकीत सात टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव सिटीलिंक कंपनीकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून शहर बससेवा सुरू करण्यात आली आहे. (Citylink city bus fare increase at beginning of new year Nashik news)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

शहर बस वाहतुकीच्या दरात भाडेवाढ करायची असेल तर त्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला प्रस्ताव सादर केला जातो. त्याअनुषंगाने महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. सिटीलिंक कंपनीच्या करारानुसार दरवर्षी पाच टक्के भाडेवाढ करणे आणि जानेवारी 2022 मध्ये पाच टक्के दरवाढ करण्यात आली होती. या वर्षी डिझेल व सीएनजीच्या दरात वाढ झाल्याने सिटीलिंक कंपनीचा तोटा भरून काढण्यासाठी सात टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

तिकीट दर आकारताना सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण होत असल्याने तिकिटाचे दर आता पूर्णांकात आकारले जाणार आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पासच्या दरातही वाढ केली जाणार आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत भाडे वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी आता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT