नाशिक

जिल्हा परिषदेच्या ६८२ शाळांना खोल्यांची गरज

CD
जिल्हा परिषदेच्या ६८२ शाळांना खोल्यांची गरज नवीन वर्गखोल्यांसह शाळा दुरुस्तीसाठी ९२ कोटींची प्रस्ताव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.७ : जिल्हा परिषद शाळांना शिक्षक मिळाल्यानंतर आता वर्गखोल्यांची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ६८२ शाळांना नवीन वर्ग आवश्‍यक असून ८२६ खोल्यांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीला पाठविला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार २८२ शाळांमध्ये २ लाख ५३ हजार ६७८ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना इतके दिवस शिक्षक नव्हते. पदवीधर आणि उपशिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक हजारांवर नवीन शिक्षक प्राप्त झाले. मात्र, आता वर्गखोल्यांबाबत चिंता व्यक्त केली जाते. दुरुस्तीसाठी २४ कोटी आणि नवीन वर्गखोल्यांसाठी ६८ कोटींच्या निधीची मागणी शिक्षण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे. काही ठिकाणी छताचे प्लास्टर पडणे, भिंतींना तडे जाणे तर काही ठिकाणी गळती होण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, उघड्यावर किंवा धोक्याच्या सावटाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. वाढती विद्यार्थी संख्या आणि जुन्या झालेल्या वास्तू लक्षात घेता, शाळांकडून प्राथमिक शिक्षण विभागाकडे ६८२ नवीन वर्गखोल्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. वर्गखोल्या अभावी अनेक ठिकाणी दोन ते तीन वर्ग एकाच खोलीत भरवावे लागत असून, यामुळे गुणवत्तेवरही परिणाम होतो. ९२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीकडे नवीन वर्ग खोल्यांसाठी प्रत्येकी ११ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. तर दुरुस्तीसाठी खोल्यांच्या स्थितीनुसार खर्चाचे प्रमाण निश्‍चित केले आहे. दुरुस्तीसाठी २४ कोटी ७८ लाखांची आवश्‍यकता आहे. तर नवीन वर्गखोल्यांसाठी ६८ कोटी १९ लाख अशी एकूण ९२ कोटी ९७ लाखांची एकूण मागणी नोंदवली आहे. तालुकानिहाय नवीन वर्ग खोल्या आणि नादुरूस्त वर्ग खोल्या तालुका....नवीन वर्ग ...........दुरूस्ती बागलाण........४२...............७१ चांदवड.......३०...............३८ देवळा..........४.............१७ दिंडोरी..........७५................५३ इगतपुरी...........५७..............६३ कळवण.................४६...............५९ मालेगाव............६५........६२ नांदगाव.........४०.............५० नासिक...............३२..........२६ निफाड..........३७............३८ पेठ.............४५...............५२ सिन्नर...........४६............४६ सुरगाणा..........८१............१३६ त्र्यंबकेश्वर............४१.........६९ येवला................४१.......४६ एकूण..........६८२........८२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Agitation Suspended : एमपीएससी विद्यार्थ्यांचे टिळक चौकातील आंदोलन स्थगित; उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निर्णय

MP Murlidhar Mohol : 'विकसित भारत’चा संकल्प प्रत्येक भारतीयाचा व्हावा; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

IMD Rain Alert : 16 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा, काही भागांत ताशी 75 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, महाराष्ट्रातूनही मान्सूनच्या माघारीला पोषक स्थिती

Mithun Chakraborty: ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती पश्चिम बंगाल सरकारचे सल्लागार म्हणून नियुक्त; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल

Pune News : चारा टंचाईआधीच पशुसंवर्धन विभाग ‘अलर्ट’; पीक अवशेष जाळण्याऐवजी साठवणूक, प्रक्रिया आणि पोषणमूल्यवर्धनावर भर

SCROLL FOR NEXT