clean survey campaign esakal
नाशिक

Nashik : स्‍वच्‍छता पथक करणार खतप्रकल्‍पाची पाहणी

अरूण मलाणी

नाशिक : स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत (Clean Survey Scheme) केंद्र सरकारचे (central government) पथक सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. गेल्‍या तीन दिवसांत या पथकामार्फत शहर परीसरातील विविध भागांची पाहणी करताना पंचवीस प्रभागांना भेटी दिलेल्‍या आहेत. शहराबाहेर असलेल्‍या खत प्रकल्पाला (fertilizer project) भेट देताना तेथील माहिती घेणार असल्‍याचे समजते. दरम्‍यान आतापर्यंतच्‍या दौऱ्यातून पथकाकडून समाधान व्‍यक्‍त करण्यात आल्‍याने यंदा स्‍वच्‍छ शहरांच्‍या यादीत नाशिक अग्रस्‍थानी असेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला जातो आहे. (clean survey scheme team to inspect fertilizer project Nashik News)

शहर परिसरातून संकलित होणाऱ्या ओला व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करत नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, व्यावसायिक भागांमध्ये ओला व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंडी ठेवण्याच्‍या सूचनांची अंमलबजावणी आदींची माहिती पथकाकडून घेतली जाते आहे. कचरा संकलन प्रक्रियेबाबत नागरिकांचा अभिप्रायदेखील नोंदविला जातो आहे. उद्यानांसह सार्वजनिक ठिकाणी स्‍वच्‍छतेबाबत फेरपडताळणीदेखील केली जाते आहे.

केंद्र शासनाच्‍या स्वच्छ शहर स्पर्धेअंतर्गत केंद्रीय पथकांकडून तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाते. पहिल्‍या टप्‍यातील सर्वेक्षण या पथकाकडून सुमारे दोन महिन्‍यांपूर्वी केले होते. आता पुन्‍हा हे पथक गेल्‍या तीन दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी फिरताना पाहणी करत अभिप्राय जाणून घेत आहे.

दरम्‍यान नाशिकचा पहिल्‍या पाच शहरांमध्ये समावेश होण्यासाठी महापालिका आयुक्‍त रमेश पवार यांच्‍याकडून प्रयत्‍न सुरु आहेत. त्याअनुषंगाने शहर स्वच्छ राखण्यासंबंधीच्या सूचना विभागांना दिलेल्‍या आहेत. घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, बांधकाम, नगररचना, यांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छतेवर भर देण्याच्‍या सूचनांचा समावेश आहे. दरम्‍यान संपूर्ण पाहणीनंतर पथक आपला अहवाल सादर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT