नाशिक

पाथर्डी फाटा परिसरात गटाराचे घाण पाणी रस्त्यावर

CD
फोटो : B12917 सिडको : विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांना निवेदन देताना चेतन फेगडे, सुभाष आल्टे, बी. पी. गडाख, प्रमोद गायकवाड आदी -- पाथर्डी फाटा परिसरात गटाराचे पाणी रस्त्यावर इंदिरानगर, ता. १४ : आनंदनगर भागात रस्त्यावर वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाणी तातडीने रोखण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील पाण्याच्या टाकीमागे, शिवगंगा हिल्स व गोविंद बिल्डिंगसमोरील गटाराच्या चेंबरमधून गेल्या दोन- तीन महिन्यांपासून वारंवार सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. सहा- सात दिवसांपासून सर्वदूर हे सांडपाणी वाहत असल्याने दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मलनिस्सारण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाय होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. कर्मचारी तात्पुरती साफसफाई करतात; मात्र काही वेळाने पुन्हा सांडपाणी वाहू लागते. नवीन पाइपलाइन टाकल्यानंतरच समस्या सुटेल, असे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याचे नागरिकांनी नमूद केले. उपअभियंता हेमंत पठे यांनी घटनास्थळी पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष चेतन फेगडे, प्रगती फेगडे, सुभाष आल्टे, बी. पी. गडाख, प्रमोद गायकवाड, चेतन पाटील, विनोद भदाणे, माधुरी भंगाळे, अरुण देसले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anganwadi Sevika Promotion : अंगणवाडी सेविकांसाठी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! वयोमर्यादेचा अडथळा दूर, 55 वर्षांपर्यंतच्या सेविकांना मिळणार पदोन्नती, 'ती' अट रद्द

मालाड स्टेशनवर चुकीचा स्पर्श, पुन्हा तेच करायला आला... प्राप्ती रेडकरने सांगितला तो प्रसंग; म्हणते- मी थेट त्याची...

Maharashtra Live News : कोल्हापुरात शेतकऱ्यांचा चक्काजाम; साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही : राजू शेट्टी

पूरा इंडिया, अब दुबई आ रहा है! सूर्यकुमार यादवने Dubaiत खरेदी केलं घर, कारणही सांगितलं.. म्हणाला, इथे जी सुरक्षा मिळतेय...

Kagal to Hubli Highway Closed : कागल ते हुबळी महामार्ग बंद, कोल्हापूर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितला पर्यायी मार्ग; शेतकरी संघटनांची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT