Drinking water tank in the premises of District Government Hospital esakal
नाशिक

Civil Hospital: पिण्याच्या पाण्याचे सदोष नमुने निघाल्यानंतर जिल्हा रूग्णालयातील जलकुंभाची साफसफाई!

सकाळ वृत्तसेवा

Civil Hospital : त्र्यंबकरस्त्यावरील जिल्हा शासकीय रूग्णालयात दररोज शेकडो रुग्ण व त्यांच्या नातलगांची जा- ये असते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या जलकुंभातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले असता, हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

याची गंभीर दखल आरोग्य सेवेच्या उपसंचालकांनी घेतल्यानंतर जलकुंभाची साफसफाई करण्यात आली आहे. (Cleaning of Jalakumbh in civil District Hospital after defective samples of drinking water nahsik news)

जिल्हा रूग्णालयात येणारे सर्वसामान्य नागरिक हे आवारातील जलकुंभाचेच पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र त्याची नियमित साफसफाई होत नसल्याची गंभीर बाब समोर आली होती.

या पाण्याचा फेब्रुवारीतील नमुन्याचा अहवाल पिण्यायोग्य नसल्याचा आल्याने आरोग्य उपसंचालकांनी त्यासंदर्भात तातडीने जिल्हा रुग्णालयाकडे विचारणा करण्यात आली आणि जलकुंभाची तातडीने साफसफाई करून येत्या काळात नियमित साफसफाईसह रुग्ण व त्यांच्याया नातलगांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नियमित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयाकडून सूचना पालन न केल्याने दूषित पाण्यामुळे साथरोगाचा फैलाव झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा रुग्णालयाचीच असेल अशीही तंबी आरोग्य उपसंचालक मनोहर धूम यांनी दिली आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

या आहेत सूचना

- पिण्याचे पाण्याच्या कुंभाची नियमित साफसफाई/स्वच्छता करावी

- स्वच्छतेसंदर्भातील नोंदवही करून त्यात नोंदी ठेवाव्यात.

- पाण्यात क्लोरिनचे प्रमाणाची तपासणी करावी.

- ब्लिचिंग पावडर/मेडिक्लोरने पाणी शुद्ध करावे

"जिल्हा रुग्णालयातील जलकुंभाची नियमित साफसफाई केली जाते. फेब्रुवारीतील नमुन्यानंतर पुन्हा नमुने तपासले असता ते नॉर्मल आले आहेत. यापुढेही दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत." - डॉ. उत्कर्ष दुधेडिया, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT