Cleaning of sports complex including Modi Maidan for youth festival nashik news esakal
नाशिक

Nashik Youth Festival : मोदी मैदानासह क्रीडासंकुलाची स्वच्छता; प्रत्येक राज्यातून 100 युवक-युवती

युवा दिनानिमित्त शहरात होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्‌घाटन पंचवटीतील मोदी मैदानावर होणार आहे, तर समारोप विभागीय क्रीडासंकुलात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Youth Festival : युवा दिनानिमित्त शहरात होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्‌घाटन पंचवटीतील मोदी मैदानावर होणार आहे, तर समारोप विभागीय क्रीडासंकुलात होणार आहे. त्यामुळे या परिसराच्या स्वच्छतेला गती आली आहे.

केंद्र शासनाच्या माध्यमातून महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य शासनाला मिळाली आहे. (Cleaning of sports complex including Modi Maidan for youth festival nashik news)

शहरातील चार ठिकाणी १२ ते १६ जानेवारीदरम्यान २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे. त्यामध्ये देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील युवक-युवती सहभागी होतील. त्यासाठी परिसराच्या स्वच्छतेला वेग आला असून, महापालिकेतर्फे ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिगारे उचलण्यात आले.

तर रस्त्याच्या कडेचा गवत कचरा उचलण्यात आला. मोदी मैदानावरील स्ट्रेट लाइटची दुरुस्तीही करण्यात आली. लवकरच या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. महोत्सवात २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी १०० युवक-युवती राष्ट्रीय सेवा योजना युवा स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटन युवा स्वयंसेवक असा सुमारे आठ हजार व्यक्तींचा सहभाग असणार आहे.

१२ जानेवारीला या महोत्सवाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. शहरातील तपोवन मैदानावर हा समारंभ होईल. महोत्सवांतर्गत सांस्कृतिक, कौशल्य विकास, युवा कृती असे स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये समूह लोकनृत्य, लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व, छायाचित्र, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने यांचा समावेश असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT