नाशिक

स्वच्छता सेवा अभियान

CD
फोटो : B05037 पंचवटी : कन्नमवार पूल परिसरात स्वच्छता अभियानात सहभागी पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके. --------------- ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेला उदंड प्रतिसाद पालकमंत्री व महापौरांनी हातात झाडू घेऊन केला श्रमदान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि सेवा संकल्प अभियानाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात स्वच्छतेला लोकचळवळीचे स्वरूप देणारी विशेष मोहीम राबवण्यात आली. ‘उन्नत नाशिक’ अभियानांतर्गत पंचवटीतील कन्नमवार पूल परिसरात झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आडके यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सहभाग घेतला. मोहिमेत महापौरांसोबतच नगरसेवक सुरेश पाटील, सुधाकर बडगुजर, जुई शिंदे, प्रियंका माने, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक आवेश पलोड, स्वच्छतादूत, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. कन्नमवार पूल परिसर आणि गोदाकाठचा भाग स्वच्छ करत उपस्थितांनी स्वच्छ नाशिकचा संदेश दिला. या वेळी नागरिकांशी संवाद साधताना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी स्वच्छतेला जीवनाचा अविभाज्य भाग मानले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानातून त्याच विचाराला कृतीचे रूप दिले. या अभियानामुळे देशभरात स्वच्छतेविषयी मोठी जनजागृती झाली आहे. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली तर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी नाशिकचा संकल्प नक्कीच पूर्ण होईल. नाशिक हे धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचे सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि हरित संवर्धनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सार्वजनिक ठिकाणे, नदीकाठ आणि रस्ते स्वच्छ ठेवण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT