नाशिक

सफाई कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

CD
फोटो- 03106 नाशिक ः स्वच्छता योद्ध्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. सुरगाण्यातील सफाई कर्मचाऱ्यांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद सुरगाणा, ता. ५ ः येथील नगर पंचायतीत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविलेल्या सेवा अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान, त्यांच्या समस्या जाणून घेणे तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे या उपक्रमांतर्गत ‘सफाई मित्र सुरक्षा व सन्मान शिबिर’ आयोजित करणे, नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये कार्यरत सफाई कर्मचारी अर्थात, ‘स्वच्छता योद्ध्यांशी’ त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी, समस्या व त्यावरील उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. या वेळी नगरपंचायतीच्या १२ सफाई कर्मचारी व स्वच्छता योद्ध्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष संवाद साधत समस्या समजून घेतल्या. नगरविकास शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी उपस्थित होते. स्वच्छता योद्ध्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गणवेशाचे वाटप करण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्याची नियमित तपासणी करून घेणे तसेच उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी सुरगाणा शहर कचरामुक्त करण्यासाठी नियोजन करून काम करण्याचे मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहीम अधिक व्यापक करताना सुरगाणा शहराची ओळख ‘स्वच्छ सुरगाणा सुंदर सुरगाणा पर्यावरणपूरक सुरगाणा’ अशी निर्माण करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी व स्वच्छता योद्ध्यांनी एकजुटीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. नगराध्यक्ष भरत वाघमारे, मुख्याधिकारी सुभाष जानोरे, लेखापाल निशांत नागरे, विजय गोयल, शहर समन्वयक सम्यक बागूल, प्रशांत ढिकले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT