covid centre niphad
covid centre niphad esakal
नाशिक

निफाडचे कोविड सेंटर बंद करा! ग्रामस्थांची मागणी

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये(covid care centre) दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली असून, बेड रिकामे राहात आहेत. त्यामुळे संबंधित कोविड सेंटर बंद करून उपजिल्हा रुग्णालयातील इतर आरोग्य सुविधा तातडीने सुरू कराव्यात, अशा आशयाचे निवेदन निफाडकरांच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे यांना देण्यात आले. (Close Niphad's Covid Center demand of villagers)

इतर आजारांवरील रुग्णांची गैरसोय

निवेदनात म्हटले आहे, की निफाड परिसरात कोविड रुग्णांची(Covid patients) संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने उपजिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. या सेंटरचा लाभही निफाड व परिसरातील रुग्णांना मिळाला. परंतु कोविड सेंटर झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठीच्या(Maternity) आवश्यक त्या सुविधा, शस्त्रक्रिया(Operation), लसीकरण(Vaccination), दंतचिकित्सा(Dental care), नेत्रचिकित्सा(Eye care), एक्स-रे(X-Ray), सर्पदंश(Snake bite), श्‍वानदंश(Dog bite), घात, अपघात(accidents), गंभीर दुखापती, विषबाधा उपचार, शवविच्छेदन(Postmrotem) बंद झाले आहे. परिणामी, इतर आजारांवरील रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यापासून येथे कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने ४० पैकी ३४ ते ३५ बेड रिकामे आहेत. त्यामुळे हे सेंटर बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर माजी नगरसेवक अनिल कुंदे, काँग्रेसचे निफाड तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, महेश चोरडिया, शिवसेना शहरप्रमुख संजय कुंदे, माजी नगरसेवक जावेद शेख, देवदत्त कापसे, दिलीप कापसे, नंदू कापसे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस संजय गाजरे, रमेश जाधव, बाळासाहेब कापसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT