Onion  esakal
नाशिक

Onion: बंद बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मुळावर! कांदा व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

प्रशांत बैरागी

नामपूर : कांदा व्यापारी असोसिएशनच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्या २० सप्टेंबरपासून बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प आहेत.

बारा दिवसांपासून कांदा मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना' अशी अवस्था आहे.

कांदा व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे बंद बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. ‘माय-बाप सरकार, कांदा मार्केट तातडीने सुरू करा’, अशी आर्त हाक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. (closed market committees at problem for farmers Financial dilemma of farmers due to monopoly of onion traders nashik)

जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद करण्याच्या निर्णयाबद्दल शेतकरी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. बंदकाळात बाजार समित्यांकडे कोणतीही सक्षम पर्यायी व्यवस्था नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कांदा खरेदी मार्केट बंदचे दूरगामी परिणाम भविष्यात दिसतील, असा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने तातडीने तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अभिमन पगार यांनी केली.

शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था विकेंद्रीत पद्धतीने उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बाजार समितीची राहील. याबाबत समन्वयाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेची राहील. असे आदेश असले तरी त्याची अंमलबजावणी कशी होणार हाच प्रश्न आहे.

जिल्ह्यात मार्चएंड, मजूर टंचाई, आर्थिक टंचाई, वार्षिक हिशेब तपासणी, दिवाळी आदी कारणांमुळे बाजार समित्यांमधील शेतमालाचे लिलाव अनधिकृतपणे दहा दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते.

बाजार समित्या तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बंद ठेवू नये, असे आदेश पणन संचालक सोनी यांनी दिले होते. मात्र या आदेशावर वरवंटा फिरविण्याचे काम कांदा व्यापारी असोसिएशन करीत आहे.

बाजार समित्या बंद राहिल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणनमंत्री आदींनी पुढाकार घेऊन तातडीने बाजार समित्या सुरळीत कराव्यात, अशी मागणी आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांत रोज सुमारे दहा हजार वाहनांद्वारे दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होते. बारा दिवस बाजार समित्या बंद राहिल्याने एक लाख वाहनांमधील कांदा शेतकऱ्यांकडे साचला आहे.

त्यानंतर बाजार सुरळीत झाल्यावर कांद्याची प्रचंड आवक होऊन भाव पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे.

कांदा मार्केट बंदमुळे शेतकऱ्यांचे हाल

"आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे लाल कांद्याचं मोठं नुकसान झाले असून उन्हाळ कांदा चाळीतच खराब होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने बाजार समित्या सुरू होणे काळाची गरज आहे."-अभय सावंत, कांदा उत्पादक नामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT