kalaram-mandir.jpg
kalaram-mandir.jpg 
नाशिक

माणसातच शोधा आता देव...कारण, 'मंदिर'च बंद!...इतिहासात घडतंय पहिल्यांदाच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (पंचवटी) कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरासह कपालेश्‍वर मंदिर दर्शनार्थ मंगळवारी (ता. 17) दुपारपासून बंद करण्यात आले आहे. आता ही मंदिरे पुढील सूचना येईपर्यंत बंद राहणार असली तरी मंदिरातील नित्य पूजाविधी सुरूच राहणार आहेत. 

विश्‍वस्तांकडून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

श्री काळाराम मंदिरात देशाच्या सर्वच भागातून भाविकांची बारमाही वर्दळ असते. पुढील महिन्यात श्रीरामाचा जन्मोत्सव होत आहे. त्यामुळे मंदिरातील वर्दळ वाढली आहे. परंतु देशभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आदेश दिल्याने, तसेच काही काळासाठी मंदिर बंद ठेवण्याचे आदेशित केल्याने मंगळवारी दुपारी विश्‍वस्तांनी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 

श्री काळाराम मंदिर प्रथमच बंद 

पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी या मंदिराची उभारणी केली आहे. मंदिराच्या उभारणीपासून आजवर इतक्‍या प्रदीर्घ काळ मंदिर कधीही दर्शनार्थ बंद राहिलेले नाही, असे विश्‍वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले. मंदिरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे आता प्रशासनाच्या सूचनेनुसार व पुढील सूचना येईपर्यंत देवस्थान बंदच राहील, असे त्यांनी सांगितले. मात्र याकाळात आतील दैनंदिन पूजाविधी व इतर दिनक्रम सुरळीत सुरू राहतील, असे "सकाळ'ला सांगितले. 

 कपालेश्‍वर मंदिरही बंद 

पंचवटीतील श्री काळारामानंतर सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर म्हणजे कपालेश्‍वर महादेव मंदिर. कोरोनाचा डंख इतर धार्मिक स्थळांप्रमाणेच कपालेश्‍वरालाही बसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी नोटीस बजावल्याने हे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. देवस्थानच्या विश्‍वस्तांनी प्रशासनाच्या सूचनेचा आदर करत हा निर्णय घेतलेला असला तरी बंदच्या काळातही मंदिरातील नित्य पूजाअर्चा व इतर दिनक्रम सुरूच राहणार आहेत. भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अनिल दौंडे, भाऊसाहेब गंभिरे, मंडालेश्‍वर काळे आदींनी केले आहे. 

रामकुंडावर शुकशुकाट 

कोरोनाचा धसका घेत धार्मिक पर्यटकांनीही नाशिककडे पाठ फिरविल्याने एरवी मोठी वर्दळ असलेल्या रामकुंडावरील गर्दीही ओसरली आहे. एकतर कुंडातील पाणी अत्यंत दूषित झालेले आहे, तर दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांची वर्दळ रोडावली आहे. त्यामुळे पहाटेपासून वर्दळ असलेल्या रामकुंडावर सद्या दशक्रिया विधींचा अपवाद वगळता शुकशुकाट दिसून येतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT