CM Eknath Shinde praises PM Modi in Nashik  
नाशिक

MP Modi In Nashik : मोदी लक्षद्वीपमध्ये गेले अन् मालदीवमध्ये भूकंप आला; CM शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील मोदींचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्पप्न पूर्ण केल्याचं देखील शिंदे म्हणाले.

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, यादरम्यान आज मोदींच्या हस्ते नाशिक येथे राष्ट्रीय युवा मोहत्सवाचं उद्घाटन होणार आहे, यापूर्वी नाशिकच्या तपोवण येथे मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाही तर मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं अयोध्येतील राम मंदिराचं स्पप्न देखील पूर्ण केल्याचं शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde praises PM Modi in Nashik Marathi News )

मुख्यमंत्री शिंदेंनी महाराष्ट्राच्या कुंभ नगरीत पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. तसेच त्यांनी राष्ट्रीय युवा मोहत्सवाचं आयोजन नाशिकमध्ये करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार देखील मानले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, प्रभु राम आणि लक्ष्मण सीता मातेला घेऊन गोदावरीच्या किन्याऱ्यावर पंचपटीत आले होते. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धर्तीवर पंतप्रधान आले ही आनंदाची बाब आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अयोध्येत भव्य राम मंदीराचे निर्माण व्हावे हे कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न आणि बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं आहे. त्यांचे आभार मी शब्दात मानू शकत नाही, एवढंच सांगेन की 'मोदी है तो मुमकिन हैं!' आपले मोदीजी लक्षद्वीपमध्ये गेले आणि मालदीवमध्ये भूकंप आला. आता आपल्या देशाकडे वाइट नजरेने पाहण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही, हे फक्त आपल्या पंतप्रधान मोदींमुळे, आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगात गाजत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आपल्या देशाचं नाव आता जगभरात सन्मानाने घेतलं जात आहे. जी२० होत आहे, चांद्रयान यशस्वी अभियान होत आहे. त्यामुळे अनेक देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आपल्या पंतप्रधानांसोबत सेल्फी घेत आहेत, कोणी बॉस म्हणतंय, कोणी वाकून नमस्कार करत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपला देश महासत्ता बनण्याकडे जात आहे हे पाहून छाती गर्वाने फुलून येते असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

नाशिकमध्ये मोदींचं जंगी स्वागत

नाशिक येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यानंतर मोदींनी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात महंतांच्या उपस्थितीत मंदिरात पूजा केली. गोदावरीचे पूजन करत, नदीचे पाणी हातात घेऊन अर्घ्य दान देखील केलं. यापूर्वी नाशिक शहरातून रोड शो देखील काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT