Chief Minister Eknath Shinde while guiding the citizens gathered for the reception on Friday night. esakal
नाशिक

राज्यात खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार : CM शिंदे

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर (जि. नाशिक) : राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार खऱ्या अर्थाने स्थापन झाले असून, हे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे सरकार असल्यामुळे कुणाचीही निराशा होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाथर्डी फाटा चौकात उपस्थित नागरिकांना दिले.

शुक्रवारी (ता. २९) रात्री अकराच्या सुमारास येथे आगमन झाल्यानंतर श्री. शिंदे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, शिवसेनेचे माजी सभागृहनेता मामा ठाकरे, योगेश मस्के आदी उपस्थित होते. (CM eknath Shinde statement after coming to nashik Latest Maharashtra Political News)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की नाशिक विभागाचा जातीने आढावा घेण्यासाठी मी स्वतः आलो आहे. शहर व जिल्ह्यासाठी काहीही कमी पडणार नाही. पंढरपूरच्या धर्तीवर नाशिकच्या आसपासच्या तीर्थक्षेत्रांचादेखील विकास करण्यात येईल.

तत्पूर्वी पाथर्डी फाटा चौकात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सायंकाळी सातपासूनच शिंदे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महिलांनी औक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी हार अर्पण केला. मामा ठाकरे यांनीदेखील त्यांचे स्वागत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मात्र मुख्यमंत्री म्हणून त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि स्वागतासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी दिली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण पाथर्डी फाटा चौक फलकांनी आणि भगव्या झेंड्यांनी सजविण्यात आला होता.

सेनेच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेश म्हस्के, सुजित जिरापुरे, राम रेपाळे आदींनी संयोजन केले. या वेळी विविध संघटना, पक्ष आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्यासोबत राहू, असे सांगत त्यांच्या सेनेत प्रवेश केला. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता.

चिमुरड्याकडून पोर्ट्रेट भेट

नाशिक रोड येथील टिबरेवाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावीत शिकणाऱ्या मयुरेश आढाव या सहावीच्या विद्यार्थ्याने ॲक्रेलिक शैलीत कॅनव्हासवर काढलेले मुख्यमंत्री शिंदे यांचे पोर्ट्रेट त्यांना भेट दिले. या वेळी त्याचे वडील राजेंद्र, आई सायली आणि कुटुंबीय उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina Death Sentence Demand : ''शेख हसीना यांना मृत्युदंड द्या'' ; बांगलदेशच्या 'ICT' मुख्य अभियोक्त्यांची मागणी!

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

SCROLL FOR NEXT