Public Health Mission sakal
नाशिक

Public Health Mission: आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘चक्र’चे भूमिपूज; आरोग्य केंद्रात होणार ५० टक्के शस्त्रक्रिया: मुख्यमंत्री

50 Percent Surgeries to Be Conducted at Primary Health Centres: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठात 'चक्र' योजनेचे भूमिपूजन; आता ५०% शस्त्रक्रिया आरोग्य केंद्रांमध्ये होतील.

सकाळ वृत्तसेवा

CM Fadnavis Lays Foundation for 'Chakra' at MUHS: महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १३ कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण सरकारने दिले आहे. परंतु, आरोग्य क्षेत्रातील किमान ५० टक्के शस्त्रक्रिया या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये व्हायला हव्यात. त्यादृष्टीने पुढील चार वर्षात या आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आरोग्य विभागांना त्याचे लक्ष्य दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स ‘चक्र’ (सेंटर फॉर हेल्थ,अप्लाईड नॉलेज ॲण्ड रिसर्च ॲटॉनॉमी) याचे भूमिपूजन रविवारी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या माध्यमातून आरोग्य विद्यापीठ हे ’हब’ स्थापित करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालय ’स्पोक’ म्हणून कार्यरत राहतील. विद्यापीठांनी अन्य संस्थांना मार्गदर्शक म्हणून काम करावे इतके आदर्श काम करणे अपेक्षित आहे.

विद्यापीठात ’चक्र’ द्वारे जनुकीय आरोग्य व समाजोपयोगी संशोधनावर अधिक भर द्यावा, ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना होईल, असे आवाहनही त्यांनी केले. कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT