नाशिक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची कार्यशाळा

CD
फोटो : NSK26H34778 नंदुरबार : कार्यशाळेस उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, चंद्रकांत पवार आदी. ------------------ ग्रामपंचायतींनी अभियानात सहभाग नोंदवावा नमन गोयल : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. ८ : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात १०० टक्के सहभाग नोंदवून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. अभियानातील सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतींनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले. येथील जिल्हा परिषदेत ग्रामविकास व पंचायतराज विभागातर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. याहामोगी सभागृहात आयोजित या कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी प्रास्ताविक केले. ‘जलसमृद्ध हरित गाव’ हा अभियानाचा महत्त्वपूर्ण घटक असून, नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष प्रयत्न करावेत. गावातील जलस्रोतांचे संवर्धन, पाणी साठवण, पावसाच्या पाण्याचे नियोजन, जलपुनर्भरण, लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. जलसमृद्ध गावाच्या संकल्पनेतून दुष्काळावर मात करून गावांना शाश्वत जलसुरक्षा प्रदान करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यशाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या आठ घटकांवर विषयानिहाय मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध हरित गाव, अभिसरण योजना, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदान तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम या विषयांचा समावेश होता. विभागप्रमुख तसेच गटविकास अधिकारी यांनी विषयानुरूप मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिकारी मुकेश कापुरे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT