CM Eknath Shinde Group esakal
नाशिक

CM Shinde Group News : नाशिकमध्ये शिंदे गटाच्या ऐक्यात मिठाचा खडा!

विक्रांत मते

नाशिक : राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाकडून संघटना पातळीवर बळकटी आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न होत असताना नमनालाच नाराजीचे फटाके फुटताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिक संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत खुद्द पालक मंत्र्यांनाच निमंत्रित केले न गेल्याने शिंदे गटात नाराजीचा स्फोट झाला आहे. (CM Shinde Group News Meeting of MP Godse with CM aside from Guardian Minister Nashik News)

जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला रामराम ठोकत ४० आमदारांच्या मदतीने भाजपसोबत सत्ता स्थापन केली, यात शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा आली. आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण राज्यात संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांमध्ये मुख्य म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलाच सुरू लावण्याचा विडा उचलण्यात आला आहे. त्यासाठी खासदार आमदार यांच्या मदतीने शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संघटनेत आणण्यासाठी प्रयत्न होत आहे.

परंतु संघटना बळकटी सोडाच आहे त्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील आपसांत पटत नसल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकच्या प्रश्न संदर्भात आज (ता.२२) बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला पालकमंत्री म्हणून दादा भुसे उपस्थित असणे गरजेचे होते. त्या व्यतिरिक्त शहरातील आमदारांना देखील बोलावणे आवश्यक होते. मात्र गुजरात मधील भाजपच्या प्रचारासाठी आमदार पोहोचल्याने त्यांना येता आले नाही मात्र त्यांच्यापर्यंत मुख्यमंत्र्यांसमोर बैठक असल्याचा निरोप देखील पोहोचला नाही ही बाब देखील महत्त्वाची आहे.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे व शिंदे गटाचे काही पदाधिकारी वगळता शासनातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते. दादा भुसे यांना या संदर्भात विचारले असता बैठकीची आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून नाशिक मध्ये शिंदे गटात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देखील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत पालकमंत्री भुसे व खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. यावरून शिंदे गटातील सत्ता संघर्ष टोकाला पोहोचल्याचे दिसून येत आहे.

"खासदार या नात्याने मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करून नाशिकच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्याची मागणी केली होती त्यानुसार आजची बैठक झाली. तातडीने बैठक बोलविण्यात आल्याने यात नाराजीचा प्रश्न निर्माण होत नाही. आमच्यात कुठलीही नाराजी नाही. नाशिकच्या विकासासंदर्भात आम्ही सर्व एकत्र आहोत."

- हेमंत गोडसे, खासदार, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT