cm uddhav thackeray Sakal
नाशिक

मुख्यमंत्री म्हणाले, "मलाही हॉकी खेळावंस, ट्रॅकवर धावावंस वाटतंय"

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे महाराष्ट्र पोलीस अकादमीतील वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. तसेच क्रांतीच्या हुतात्म्यांना, आदिवासी क्रांतिकारकांना त्यांनी यावेळी अभिवादन केले. महाराष्ट्र पोलिस अकादमीतील सिंथेट्रीक ट्रॅक त्याला लागूनच असलेले आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार कृत्रिम हिरवळीचे हॉकीचे मैदान पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेही बालपणात हरवून गेले.

यावेळी मुक्यमंत्र्यांनी अकादमीतील हॉकी मैदानाची पाहणी केली. त्यानंतर याचा पुन्हा भाषणामध्ये उल्लेख करत त्यावर कोटी देखील केली. मुख्यमंत्री म्हणाले की, भुजबळ साहेब सरकारमध्ये आल्यावर हॉकीस्टिकचा वापर बदलतो. तुम्ही हॉकी जपून वापरा. सरकारमध्ये आल्यावर त्याच हॉकी स्टिकचा व्यवस्थित वापर करता येतो आणि समोर असल्यानंतर हॉकी कशीही वापर करता येते

हॉकीचे मैदानाची पहाणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील हॉकी खेळावी तसेच ट्रॅकवर धावावेसे वाटून गेले. मुख्यमंत्री म्हणाले की, "मलाही क्षणभर वाटलं हॉकी खेळावी. पण ट्रॅकवर उतरल्यानंतर त्याचा जो बाऊन्सिंग इफेक्ट आहे तो बघून लांबूनच बघाव वाटलं. कारण आता हॉकी खेळायचं वय निघून गेलं. आता फक्त उद्घटानं करत फिरायचं आणि पुढच्या पिढीला सुविधा द्यायच्या हेच काम आपल्या हातात आहे", असे ठाकरे म्हणाले.

व्यासपिठावर बोलतांना त्यांनीच, सिंथटीक मैदान पाहून मला हॉकी खेळायची आणि सिंथेटीक ट्रॅकवर धावायची इच्छा झाली अस सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते डिसेंबर २०१९ मध्ये या कामांची भूमीपूजन झाले होते. दोन वर्षात कोरोनाच्या प्रतिबंधात आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार तसेच फेडरेशनच्या मान्यतेनुसार क्रिडांगण तयार झाल्याने त्याविषयी अप्रतिम अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भावना मांडल्या. शेजारी-शेजारील हॉकी आणि ॲथेलॅटीक्सच्या दोन्ही मैदानावरील कृत्रिम हिरवळ धावण्याला वेगाला गती देणारे सिंथेट्रीक ट्रॅक वातावरणातील गारवा अशा वातावरणात खेळण्याचा मोह झालेल्या मुख्यमंत्र्यांनी खेळण्याची आणि धावण्याचा मोह झाल्याचे सांगतांना, कोरोनामुळे मास्क घालून फिरतांना होत असलेल्या कोंडमाऱ्याची कबुलीही दिली. ते म्हणाले दीड वर्षापासून मास्क लावून फिरतोय आज बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून मी हवेतील मोकळा श्वास घेत आहे.


नाशिक त्र्यंबक मार्गावरील महाराष्ट्र पोलिस अकादमीत आज ठाकरे यांच्या हस्ते सिंथेटीक ट्रॅक, हॉकी मैदानासह पाच मैदानाचे उध्दाटन झाले. ऑनलाईन ऐवजी थेट प्रत्यक्ष झालेल्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, वनमंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक संजय पांडे, अप्पर संजय कुमार, पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या संचालक आश्वती दोर्जे, पोलिस आयुक्त दीपक पांडे व्यासपिठावर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT