cm uddhav thackeray may visit to nashik marathi news 
नाशिक

मुख्यमंत्री ठाकरे यांचा संभाव्य नाशिक दौरा...कोरोना पार्श्‍वभूमीवर घेणार माहिती

विक्रांत मते

नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा नियोजित दौरा मुंबईतील अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता येत्या रविवारी (ता. ९) नियोजन करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. शासकीय दौरा निश्‍चित नसला तरी महापालिका व जिल्हा प्रशासनाने दौऱ्याच्या निमित्ताने अहवालाची तयारी केली आहे.

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर पाठोपाठ नाशिक मध्ये बारा हजार कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचल्याने नाशिक कोरोना हॉटस्पॉटच्या यादी मध्ये आले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ सातत्याने बैठका घेवून प्रशासनाला कोरोना नियंत्रणासाठी सुचना करत आहेत. गेल्या आठवड्यात खासदार शरद पवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह नाशिक शहरातील कोरोना परिस्थीतीचा आढावा घेतला होता. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री दौयाची तयारी सुरु झाली आहे. 

मुख्यमत्री ठाकरे यांनी पुणे येथे दौरा केला आहे. त्यानंतर नाशिक व औरंगाबाद दौऱ्याचे नियोजन होते. त्यानुसार महापालका व जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. गुरुवारी (ता. ६) दौऱ्याचे नियोजन होते परंतू मुंबईत मुसळधार पाऊस असल्याने रविवारी हा दौरा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"आम्हाला, त्याची गरज होती, आम्ही आनंदी..."! पाकड्या अबरारला करारबद्ध करण्याचा SRH कडून बचाव; विसरले, भारताचा केलेला अपमान

LPG Crisis: गॅस टंचाईवर ८० लाख लिटर केरोसीनचा ‘बॅकअप’ प्लॅन तयार, काळाबाजारावर योगींची कारवाई

Pune-Bangalore Highway Accident : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात; शिरोली पुलाजवळ, भरधाव मोटार बॅरिकेड्सला धडकली

Bike Accident: पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Xiaomi 17 Price : भारतात लाँच झाला शाओमी 17 स्मार्टफोन; पाहा किंमत अन् दमदार फीचर्स..

SCROLL FOR NEXT