DISA Course esakal
नाशिक

DISA Course : सीएमए-इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिटचे डिसा कोर्सला अधिकार

सकाळ वृत्तसेवा

DISA Course : कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाउंटंट्स (सीएमए)ला कायद्यानुसार विशिष्ट अधिकार प्राप्त झाले आहेत. तर, केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या ‘डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन सिस्टम सिक्युरिटी ऑडिट’ (डिसा) कोर्सला केंद्रीय लेखापरीक्षक म्हणून अधिकार प्रदान केले आहे. (CMA Authorization of Information Security Audit to DISA Course nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

व्यावसायिक, प्रॅक्टिसिंग सदस्यांसाठी हा बदल महत्वाचा आणि स्वगतार्ह असून सीएमएला या क्षेत्रातही कामाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असे जाणकारांचे मत आहे. लेखापाल आयटी टूल्सचा वापर करून संपूर्ण आयटी वातावरणात लेखापरीक्षण आणि मूल्यमापन करण्यासाठी सहभागींमध्ये क्षमता निर्माण करणे हा कोर्सचा उद्देश आहे.

डिसा कोर्समध्ये नवीनतम तंत्रज्ञान, माहिती आश्‍वासन आणि माहिती व्यवस्थापन कौशल्य यांचे समन्‍वय साधले आहे. सायबर क्राईमचे वाढते प्रमाण लक्षात घेता, सीएमए प्रॅक्टिशनर्स सिक्युरिटी ऑडिटच्या क्षेत्रात महत्वाची भूमिका पार पाडतील, असेही बोलले जात आहे.

माहिती प्रणाली ऑडिटकरीता ८० टक्‍के व ८० तास कोचिंग घेणे आवश्‍यक आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग मॅनेजमेंट ऑडिटकरीता वीस टक्‍के व २० तास कोचिंग घेणे आवश्‍यक आहे, अशी माहिती नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष सीएमए भूषण उत्तम पागेरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : “एकनाथ शिंदे यांना मराठ्यांमध्येच मारामाऱ्या लावून दंगल घडवायची आहे", जरांगे यांचा गंभीर आरोप

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT