नाशिक-धुळ्यात
सीएनजी महागला
मध्यरात्रीपासून नवे दर लागू
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : दिवाळीनंतर नाशिक आणि धुळे जिल्ह्यात एमएनजीएल (इंडिया) लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या दरात वाढ जाहीर केली आहे. हे नवे दर १२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच १३ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
सीएनजीच्या दरात प्रतिकिलो १.२५ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सीएनजीचा किरकोळ विक्री दर ९९.७५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. यापूर्वी हा दर ९८.५० रुपये प्रतिकिलो होता.
गॅसच्या खरेदी खर्चात वाढ आणि आयात केलेल्या ‘आरएलएनजी’च्या किमती वाढल्यामुळे ही दरवाढ करावी लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. एकूण गॅसपुरवठ्यात आयात गॅसचे प्रमाण वाढत असल्याने खर्च वाढला आहे. दरम्यान, घरगुती पीएनजीच्या दरातही प्रति एससीएम १.५० रुपयांनी वाढ करण्यात आली असून, नवा दर ५१.७५ रुपये प्रति एससीएम झाला आहे. दरवाढ झाली असली तरी पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी अजूनही सुमारे ४५ टक्के स्वस्त असून, डिझेलच्या तुलनेत २० टक्क्यांहून अधिक बचत होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे सीएनजी हा अजूनही किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय असल्याचे ‘एमएनजीएल’ने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.