नाशिक

कोड कल्प २०२६

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी... अँकर -- फोटो क्रमांक : 31710 धुळे : एस.व्ही.के.एम. एन.एम.आय.एम.एस. ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकी दिनानिमित्त झालेल्या कोड कल्प २०२६ कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी. शेजारी प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे, डॉ. मकरंद शाहाडे, प्रा. खालिद अल्फतमी आदी. -- धुळे एनएमआयएमएसमध्ये कोड कल्प २०२६ उत्साहात -- अभियांत्रिकी दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवली कलागुण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ८ : एस.व्ही.के.एम. एन.एम.आय.एम.एस. ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या येथील स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी व संलग्न शाखांच्या विभागातर्फे अभियांत्रिकी दिनानिमित्त ‘कोड कल्प २०२६’ कार्यक्रम झाला. या उपक्रमात संगणक अभियांत्रिकी, डेटा सायन्स आणि एआयएमएल शाखांमधील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. स्कूलचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंखे, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मकरंद शाहाडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. खालिद अल्फतमी, एडीएएसच्या फॅकल्टी समन्वयक प्रा. किरण सोमवंशी आणि विभाग समन्वयक प्रा. भूषण नंदवाळकर उपस्थित होते. डॉ. शाहाडे यांनी ‘कोड कल्प’च्या आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली तर प्राचार्य साळुंखे यांनी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या योगदानाचे स्मरण करत विद्यार्थ्यांना संशोधनाभिमुख विचारसरणीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमांतर्गत चेतन पाटील, रक्षा गुजराथी, डॉ. कविता पाटील यांची मार्गदर्शनपर सत्रे झाली. विविध स्पर्धांचे परीक्षण डॉ. मयुरी कुलकर्णी, प्रा. रिंकू शर्मा, प्रा. मंगेश बालपांडे, प्रा. अमीर खान पिंजारी, प्रा. माधुरी पाटील आणि प्रा. प्रियांका विभांडिक यांनी केले. प्रा. खालिद अल्फतमी आणि प्रा. किरण सोमवंशी यांनी समन्वयन केले. या उपक्रमाचे एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट व चान्सलर स्नेहा अंकित पारिख, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पस चेअरमन संजय अग्रवाल, मार्गदर्शक डॉ. अजय पसारी, कुलगुरू डॉ. अंकुर कुलकर्णी यांनी कौतुक केले. - विविध स्पर्धेतील विजेते यावेळी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये ‘उलझन में सुलझन’मध्ये समर्थ कासार यांनी प्रथम, जयेश पाटील व कुणाल पाटील यांनी द्वितीय, तर अभिषेक सिंह व हर्षल मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ‘बग बस्टर’ स्पर्धेत हेमंत माळी व ओम हिरे प्रथम, हिमेश सोनार व अमेय डेरे द्वितीय, तर निकिता भावसार व आदित्य आढाव तृतीय ठरले. ‘ब्लाइंड बाइट’ मध्ये ज्ञानराज पाटील व कृष्णा पाटील हे विजेते ठरले. तर प्रांजल बागड व पीयूष पाटील उपविजेते ठरले. ‘वेब व्हर्स’मध्ये देवेश पाटील व ऋषिकेश माळी यांनी विजेतेपद मिळवले. तर ओम राजपूत व खुशी शिंदे उपविजेते ठरले. ‘पोस्टर बॅटल’मध्ये आयुष झोडपे व टीम विजेती ठरली असून, स्नेहल सोनवणे व टीम उपविजेती ठरली. तसेच, ‘पिच टँक’ मध्ये हसन रझा फारूके हे विजेते ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT