Cold snap raises grape color sakal
नाशिक

कडाक्‍याच्या थंडीने द्राक्षपंढरी हबकली! निफाडचा पारा 4.5 अंश सेल्सिअस वर

उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे रविवारी दिवसभर धुक्याचे साम्राज्य पसरल्यानंतर सोमवारी (ता.२४) राज्याच्या किमान तापमानात वेगाने घसरण झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २५) उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला असून, उर्वरीत राज्यातही गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

निफाड उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडचा द्राक्ष पंढरीचा पारा सोमवारी पाच पॉईंट पाच अंश सेल्सियस तापमान मुळे दिवसभर गार हवा तसेच धुकेसदृश्य वातावरणाने नागरिक चांगलेच गारठलेले होते. तर आज मंगळवार दिनांक 25 रोजी 4.5 अंश तापमानाची नोंद झाली. असून त्यातच सोमवारी पारा चालु हंगामातील निचांकी पातळीवर आला आहे.

द्राक्ष बागायतदारांना या हंगामात पारा घसरल्याने प्रतवारीवर परिणाम होण्याचा धोका आहे. पहाटेपासुन द्राक्षबागेला पाणी देणे शेकोटी पेटविणे हे नित्याचे उपाय सुरु आहेत. पारा घसरल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबणार आहे. पिकलेल्या द्राक्षमण्यांना तडे जाऊन नुकसान होण्याचा धोका आहे रब्बी हंगामातील गहु हरभरा कांदा पीकाला घसरलेला पारा पोषक आहे. थंडीमुळे जिल्ह्यात सुरु होत असलेल्या शाळांत जाणार्या विद्यार्थ्यांना ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. ठिकठिकाणी वाडी वस्त्यांवर शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे.

निफाडला पारा थेट ५.५ अंशावर आल्याची ही चालु हंगामातील निचांकी पातळी आहे. द्राक्षबागांच्या फुगवणी थाबल्या आहेत द्राक्षवेलीच्या पेशींचे कार्य मंदावते आहे थंडीपासुन बचावात्मक पर्याय हा पाहाटे पाणी देणे व शेकोटी करणे हाच आहे परिपक्व द्राक्षमण्यांना तडे जाऊन नुकसानीचा धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT