Winter esakal
नाशिक

Winter Weather : थंडीचा तडाखा कायम; नाशिकचे किमान तापमान 9 अंशांवर!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : काही दिवसांपासून वातावरणातील गारवा कायम आहे. शीतलहरींमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली असून, किमान तापमान एक आकडी राहाते आहे. बुधवारी (ता. ११) नाशिकचे किमान तापमान नऊ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

तर कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आलेली आहे. थंडीपासून बचावासाठी स्‍वेटर, जॅकेटसह शॉलचा आधार नाशिककरांकडून घेतला जात आहे. (Cold weather continues Minimum temperature of Nashik at 9 degrees Winter Weather nashik news)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

नववर्षाच्‍या पहिल्‍या दिवसापासून वातावरणात गारवा जाणवत होता. गेल्‍या दोन-तीन दिवसांत पारा खालावल्‍याने व त्‍यातच वातावरणात शीतलहरी वाहत असल्‍याने गारव्‍याचा अनुभव नाशिककरांना येत होता.

कमाल तापमानात कमालीची घसरण झालेली होती. कमाल तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. बुधवारी कमाल तापमानात वाढ नोंदविली असून, ३०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आलेली आहे.

किमान तापमान एकआकडी राहात असल्‍याने सायंकाळनंतर वातावरणात गारठा जाणवत होता. शेकोटी पेटवत नाशिककरांनी गारठ्यापासून बचाव करण्यावर भर दिला. पुढील काही दिवस वातावरणात गारवा कायम राहणार असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT