Nashik District Collector Gangatharan D. esakal
नाशिक

Nashik News: तहसीलदार राजश्री गांगुर्डेंना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक रोड-देवळाली मतदारसंघातून इच्छुक म्हणून चर्चेत असणाऱ्या तहसीलदार राजश्री अहिरराव-गांगुर्डे यांच्या सोशल मीडियातील प्रसिद्धीकडे जिल्हा यंत्रणेने लक्ष घातले आहे.

प्रशासकीय अधिकारी असताना छायाचित्र टाकून जाहिरातबाजी कशी करता, अशी विचारणा जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केली आहे. त्यामुळे अहिरराव पुन्हा चर्चेत आल्या आहेत. (Collector gangatharan d notice to Tehsildar Rajshree Gangurde Nashik News)

अहिरराव यांचे ‘ओजस्वी फाउंडेशन’ या नावाने सामाजिक व्यासपीठ आहे. त्यामार्फत त्या सामाजिक उपक्रम राबवितात. सोशल मीडियावर त्याच्या पोस्ट टाकतात. देवळाली मतदारसंघात त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.

त्यांच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. अहिरराव यांनीही स्वतः कधी त्या देवळाली मतदारसंघातून इच्छुक नसल्याचे खंडन केलेले नाही.

या पार्श्वभूमीवर देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी थेट विधानसभेत अहिरराव यांच्या कामकाजाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आता पुन्हा हा विषय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नोटीस काढून त्यांच्या सामाजिक उपक्रमाच्या प्रसिद्धिविषयी प्रश्न विचारत खुलासा मागवला आहे.

"मी ओजस्वी फांऊडेशन या नोंदणीकृत संस्थेची संस्थापक अध्यक्ष असून, संस्थेमार्फत महिलांच्या विकास, आर्थिक स्वावलंबन स्वसुरक्षितेसाठी काम करते. त्याचाच भाग म्हणून उद्योजकता व व्यवसाय जनजागृती प्रशिक्षण, मॅनेजमेंट प्रशिक्षण याविषयी कार्यशाळा घेतली जाते. जनतेचे प्रश्न सोडविण्याची व समाजसेवेची मला आवड आहे. प्रशिक्षण हा कार्यक्रम राजकीय नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला व व्यक्तीला आमंत्रित केलेले नाही. हा कार्यक्रम शासनाच्या ध्येयधोरणाच्या विरुद्ध नाही. केवळ गरजूंसाठी मदत हाच त्यामागे शुद्ध हेतू आहे."

- राजश्री गांगुर्डे, तहसीलदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT