जिल्हाधिकारी सूरज मांढरे.jpg 
नाशिक

#Lockdown : सावधान! आजपासून साठेबाजी, भाववाढ करणाऱ्यांवर प्रशासनाची नजर; जिल्हाधिकारी करणार स्टिंग ऑपरेशन

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जीवनावश्‍यक वस्तू विक्रेत्यांनी दुकाने सुरू ठेवावीत. जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करतांना मालाची साठवणूक करणे, वस्तूंची साठेबाजी, भाववाढीचे प्रकार मात्र अजिबात खपवून घेणार नाही. नाशिक, शहर जिल्ह्यात असे प्रकार रोखण्यासाठी आजपासून डमी ग्राहक पाठवून तसेच छुप्या कॅमेऱ्याने स्टिंग ऑपरेशन केले जाणार आहे.

नेमकी कुठल्या ठिकाणी दरवाढ होते, याचा शोध घेण्याची प्रशासनावर वेळ 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. संचारबंदीची मुदत 14 एप्रिलपर्यंत असल्याने जीवनावश्‍यक वस्तूंचा काळाबाजार सुरू झाला आहे. किरकोळ विक्रेते माल संपला म्हणून घाऊक विक्रेते व वितरकांकडे जातात, तेव्हा त्यांना महाग वस्तू मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जेव्हा ग्राहक वस्तू खरेदीला जातात. त्या वेळी थेट 30 ते 40 टक्‍क्‍यांपर्यंत काही वस्तूंच्या किमती वाढल्याचा अनुभव येऊ लागला आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीच्या साखळीत नेमकी कुठल्या ठिकाणी दरवाढ होते, याचा शोध घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी (ता.17) अधिकाऱ्यांशी चर्चा करीत साठेबाजी आणि भाववाढीविरोधात थेट कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले. 

टीम संकट सोबती 

तेल, साखर, मीठ, मिरचीसारख्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात भाववाढ झाली आहे. किराणा दुकानदार माल घेतात तेथूनच ही भाववाढ सुरू झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. वरच्या पातळीवरच अडवणूक सुरू झाल्यास त्याचा फटका खाली बसू लागला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने टीम संकट सोबती नेमली आहे. त्यात, 17 अधिकारी असतील. प्रत्येक अधिकाऱ्याकडे वेगवेगळे विषय देण्यात आले आहेत. संचारबंदीच्या स्थितीत अडवणूक होणाऱ्या नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्रात तक्रारी देतानाच थेट अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तक्रार करता येणार आहे. त्यानंतर डमी ग्राहक पाठवून आणि छुप्या कॅमेऱ्यांनी शूटिंग करून काळाबाजार आणि जादा दराने विक्री करणाऱ्यावर कारवाया करण्यात येणार आहेत. 

वाहनांना कोड 

दूध, भाजीपाला अथवा जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी हेल्पलाइन सुरू केली आहे. वाहनधारकांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानंतर विशिष्ट कोड नंबर असलेला पासवर्ड मिळेल. तो पासवर्ड जीवनावश्‍यक वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या दर्शनी भागात चिटकवल्यास वाहनांना विनाअडथळा दुकानांपर्यंत वस्तूंचा पुरवठा करता येणार आहे. तसेच शेतमाल, पोल्ट्री, मांसाहाराची वाहतूक करणारी वाहने तसेच पाळीव प्राण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या मालाच्या पुरवठ्याच्या वाहनांसाठी असे क्रमांक उपलब्ध असणार आहे. 

भाववाढ रोखण्यासाठी डमी ग्राहक पाठवून स्टिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. छुपे कॅमेरे लावून आणि बनावट ग्राहक पाठवून चौकशी केली जाणार आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT