Junior Colleges Admission News esakal
नाशिक

11th Admission News : अकरावी प्रवेशासाठी उद्यापर्यंत नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाकरिता दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

त्‍यानुसार विद्यार्थ्यांना नोंदणी करून अर्जाचा भाग एक व दोन भरण्यासाठी गुरुवार (ता.२९) पर्यंत मुदत असेल. या फेरीची निवड यादी ३ जुलैला सकाळी दहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. (College Admission Registration for 11th admission till tomorrow Nashik News)

शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत पहिली फेरी पार पडलेली आहे. यापूर्वी प्रसिद्ध केलेल्‍या यादीतील विद्यार्थ्यांना काल (ता.२६) पर्यंत वाढीव मुदत देण्यात आलेली होती. त्‍यानंतर मंगळवारी दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

दरम्‍यान, पहिल्‍या प्रवेश फेरीत एकूण ८ हजार १४१ जागांवर प्रवेश निश्‍चित झाले आहे. यामध्ये ७ हजार ३७९ प्रवेश हे नियमित प्रवेश फेरीतून झालेले असून, उर्वरित ७६२ प्रवेश कोट्याच्‍या जागांवर झालेले आहेत. यानंतर पुढील प्रवेश फेरीसाठी १५ हजार २४३ जागा रिक्त‍ असून, कोट्याच्‍या ३ हजार ४९६ जागा अशा एकूण १८ हजार ७२९ जागा रिक्‍त आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुसऱ्या फेरीसाठी नोंदणीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरु झालेली आहे. याअंतर्गत यापूर्वी नोंदणी केलेली नसलेल्‍या विद्यार्थ्यांना नव्‍याने नोंदणी करणे, अर्जाचा भाग एक व दोन भरता येणार आहे. यापूर्वी नोंदणीकृत व अर्जाचा भाग एकचे प्रमाणिकरण केलेल्‍या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरतांना सुधारित पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. पसंतीक्रम नोंदविल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक करणे अपेक्षित आहे.

दुसऱ्या प्रवेश फेरीचे वेळापत्रक असे-

ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत-----२९ जून

कोट्याच्‍या जागांसाठी प्रवेश----------३० जून ते २ जुलै

दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्धी---३ जुलै

निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश मुदत---३ ते ५ जुलै

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT