Wildlife parts seized
Wildlife parts seized esakal
नाशिक

Crime : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वन्यजीवांच्या अवयवांची विक्री!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबोली, कनाशी येथून वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या घटना ताज्या असताना बिबट्याची कातडी विकणाऱ्या तिघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वनविभागाच्या विशेष पथकाने मंगळवारी (ता.२०) शहरातील कृषीनगर जॉगिंग ट्रक परिसरातील सायकल सर्कल येथून अटक केली.

या तिघा संशयित यांच्याकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एका बिबट्याच्या कातडीसह चिंकारा, नीलगाय यांची प्रत्येकी दोन शिंगे देखील जप्त केली आहे. जिल्ह्यासह थेट शहराच्या मध्यवस्तीत हा सर्व प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (College student selling wildlife parts 3 students arrested Nashik Crime Latest Marathi News)

अंबोली घाट आणि नाशिक- पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर बिबट्याच्या कातडीचा तस्करी करणाऱ्या अटक केल्यानंतर नाशिक वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील काही तस्कर यांच्याकडे बिबट्याची कातडी विक्रीस असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी मुख्य वनसंरक्षक, पश्‍चिम विभागाचे उपवनसंरक्षक आणि सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या मदतीने बनावट ग्राहक बनत तस्कर यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर शहरातील कृषीनगर जॉंगिग ट्रक परिसरात भेटण्यासाठी वेळ घातला. त्यानुसार वनविभाच्या पथकाने मंगळवारी (ता.२०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या भागात सापळा रचला. त्यानंतर याठिकाणी संशयित तिघे जण हे वन्यजीवांचे अवयव विक्रीसाठी घेऊन आले. त्यानंतर त्यांनी अवयव दाखविताच या सर्व तस्कर यांना पथकाने अवयवांची विक्री करतांना रंगेहाथ पकडले.

या तस्करांकडून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. भदाणे यांनी अधिक माहिती घेतली असता ते सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी निघाले. त्यामुळे या तस्करीमध्ये आणखी संशयित असल्याची शक्यता विभागाकडून दर्शविण्यात आली आहे. या कारवाईत पथकाने ह्या संशयित यांच्याकडून बिबट्याची कातडीसह चिंकार आणि नीलगायी यांची प्रत्येकी दोन शिंगे आणि चार मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. या तिघां संशयित यांच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT