Commercial Beekeeping Benefits Business Opportunities training by sakal agrowon nashik news  esakal
नाशिक

Sakal Training : व्यावसायिक मधमाशीपालन, फायदे, व्यवसाय संधी; दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

Sakal Training : मधमाशी आहे म्हणून सजीवसृष्टी आहे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध आहे.

मधमाशीपालन केवळ मधासाठी नसून परागीभवनासाठी फायदेशीर असून याद्वारे पीकउत्पादन वाढीस मदत होते. द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला तसेच फुलशेती अशा अनेक पिकांमध्ये याचे उत्तम परिणाम दिसत असल्याने हा व्यवसाय करण्यास भरपूर वाव व संधी आहेत. (Commercial Beekeeping Benefits Business Opportunities training by sakal agrowon nashik news)

मधमाशीपालन व्यवसाय म्हणून कसा करावा, मध उत्पादन घेण्यापासून ते मधमाशीपालनात उद्योजक कसे व्हावे, ह्या विषयी मधमाशी पालन विषयी प्रात्यक्षिकांवर आधारित दोन दिवसीय खास प्रशिक्षण २४ व २५ जून रोजी सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे नाशिक सातपूर सकाळ कार्यालयात आयोजिले आहे.

प्रशिक्षणात मधमाशांचे महत्त्व, विविध जाती, जीवनचक्र, वसाहतींचे व्यवस्थापन, मधमाशा हाताळणी, काळजी, मधमाशांपासून मिळणारे उपपदार्थ, मधप्रक्रिया इ.विषयी मधमाश्‍यांच्या संवर्धनात अनेक वर्षांपासूनचा प्रॅक्टिकल अनुभव असणारे मार्गदर्शक तज्ज्ञ ऋषिकेश औताडे हे मार्गदर्शन करणार आहेत. नावनोंदणीसाठी संपर्कः ९२८४७ ७४३६३

प्रशिक्षणातील विषय

१. मधमाशी पासून मिळणारे फायदे, वेगवेगळ्या पाळीव जाती

२. मधमाशांसाठी लागणारी झाडे व उपकरणे

३. मधमाशी वर येणाऱ्या विविध रोग व किडी

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

४. मधमाशीपालनाचे अर्थशास्त्र

५.मधमाशीपालनातील उपकरणे व प्रदर्शन

६.मधमाशीपालनातील विविध औजारे व सातेरी, युरोपियन, ट्रायगोना व फुलोरी मधमाशी पेट्या ओळख व हाताळणी प्रात्यक्षिक

प्रशिक्षण वार, तारीख : शनिवार, ता.२४ व २५ जून २०२३

वेळ : सकाळी १० ते संध्या ५

ठिकाणः सकाळ पेपर्स कार्यालय, सातपूर एमआयडीसी एरिया, त्र्यंबक रोड, नाशिक

शुल्कः प्रति व्यक्ती दोन हजार रुपये ( जेवण, डिजिटल प्रमाणपत्रासह)

नावनोंदणीसाठी संपर्कः ९२८४७ ७४३६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT