नाशिक

नाशिक : आयुक्त पांडेजी, शिकवू नका; माफी मागा!

महसूल संघटनेचा ११ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा; विभागीय आयुक्तांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी शासनाला दिलेले पत्र मागे घेत महसूल विभागातील अधिकाऱ्यांची बिनशर्त माफी मागावी, या मागणीसाठी विभागातील सर्व महसूलच्या अधिकारी, कर्मचारी यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची मंगळवारी (ता.५) भेट घेत श्री. पांडे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. जर १० एप्रिलपर्यंत पोलिस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास ११ एप्रिलपासून विभागीय आयुक्त कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी अधिकारी संघटनेच्यावतीने देण्यात आला. या संदर्भात विभागीय आयुक्तांसह सचिवांना देखील निवेदन देण्यात आले.

महसूल अधिकारी हे आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर असून त्यांचे सर्व अधिकारी काढून घ्यावे, असे पत्र नाशिक शहर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना सादर केले होते. हे पत्र सोशल मिडियावर प्रसारित होताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली. यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील आपली नाराजी व्यक्त करत या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर श्री. पांडे यांनी महसूलमंत्री थोरात यांची बिनशर्त माफी मागत आपण दुखावले असल्यास दिलगिरी व्यक्त केली. मात्र मी माझ्यावर मतांवर ठाम असल्याचा देखील पुर्नउच्चार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Alert : कोयना धरणात 24,938 क्युसेकने पाण्याची आवक; उद्या सकाळी 'या' वेळेत धरणातून 1050 क्युसेक विसर्ग सुरू होणार, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Nashik Crime: लाचप्रकरणात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अडचणीत; एसीबीने तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला

Latest Live Updates Marathi : माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह हजारो नागरिकांचे नांदणी मठात लाक्षणिक उपोषण सुरू

“आई आणि बहीण ५ वर्षांपासून बोलत नाहीत” राम कपूर खुलासा करत म्हणाला...'वडिलांना मृत्यू स्वीकारण्यात मदत केली'

Ramesh Mhatre: हवं तर तडीपार करा, पण जेलमधून बाहेर सोडा; जामिनासाठी शिंदेंच्या नेत्याची हायकोर्टात गयावया

SCROLL FOR NEXT