नाशिक

अंगणवाड्यांना लोकसहभागातून मदत

CD
NSK26H32183 जळगाव : कुसुंबा येथील अंगणवाडीसाठी पंखे भेट देताना ग्रामस्‍थ. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका. ––– अंगणवाड्यांना लोकसहभागातून मदत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : पोषण माह समुदाय सहभाग, स्वामित्व आणि उत्तरदायित्व थीम अंतर्गत अंगणवाड्यांसाठी लोकसहभागातून मदत देण्यात आली. जळगाव तालुक्‍यातील वावडदा विभागांतर्गत असलेल्‍या काही अंगणवाड्यांना लोकसहभागातून वस्‍तू भेट देण्यात आल्‍या. यात विटनेर ग्रामपंचायतकडून सरपंच यांच्या वतीने चार अंगणवाड्यांना पंखे भेट देण्यात आले. तर उपसरपंच यांच्या वतीने अंगणवाडीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन प्रतिमा भेट देण्यात आल्या. सदस्य गोकुळ राठोड यांनी अंगणवाडीच्या पायऱ्या दुरुस्ती करून दिल्या. तसेच मुलांसाठी राजगिऱ्याचे पौष्टिक लाडू वाटप करण्यात आले. या व्‍यतिरिक्‍त वसंतवाडी अंगणवाडी येथे प्रवीण पाटील यांचेकडून धान्य ठेवण्यासाठी कोठ्या, तसेच वराड येथे नवीन अंगणवाडी इमारतीसाठी घड्याळ सैनिक संदीप सुरळकर यांनी दिले. पर्यवेक्षिका अर्चना धामोरे तसेच सर्व अंगणवाडी सेविकांच्यावतीने भेट वस्‍तू देण्यात आले. याशिवाय कंडारी अंगणवाडीत दानपेटीत लोकसहभागातून रोख रक्‍कम प्राप्‍त झाली. तसेच उमाळे येथे कोमल धनगर यांच्याकडून रोख रक्‍कम व छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो भेट. इंदूबाई ससाणे यांच्याकडून मुलांना खेळण्यासाठी चेंड भेट दिले. धानवड येथेही ग्रामस्‍थांकडून मदत देण्यात आली. कुसुंबा येथे प्रमोद घुगे आणि मनोज पाटील यांनी अंगणवाडी केंद्रासाठी नऊ पंखे तसेच नरेंद्र पाटील यांनी चटई भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anganwadi Sevika Promotion : अंगणवाडी सेविकांसाठी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! वयोमर्यादेचा अडथळा दूर, 55 वर्षांपर्यंतच्या सेविकांना मिळणार पदोन्नती, 'ती' अट रद्द

मालाड स्टेशनवर चुकीचा स्पर्श, पुन्हा तेच करायला आला... प्राप्ती रेडकरने सांगितला तो प्रसंग; म्हणते- मी थेट त्याची...

Maharashtra Live News : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू

पूरा इंडिया, अब दुबई आ रहा है! सूर्यकुमार यादवने Dubaiत खरेदी केलं घर, कारणही सांगितलं.. म्हणाला, इथे जी सुरक्षा मिळतेय...

Kagal to Hubli Highway Closed : कागल ते हुबळी महामार्ग बंद, कोल्हापूर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितला पर्यायी मार्ग; शेतकरी संघटनांची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT