नाशिक

एमआयडीसीत केबल डॅमेज; कंपनीचे साडेतीन कोटींचे नुकसान

CD
कंपनीची केबल डॅमेज; साडेतीन कोटींचे नुकसान एमएनजीएलच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : अंबड एमआयडीसी परिसरातील टेक्नोशेल कंपनीसमोर भूमिगत एचटी केबल ३३ केव्ही एक्सप्रेस फिडर लाइन जाणीवपूर्वक खोदून डॅमेज करण्यात आले. यामुळे कंपनीचे उत्पादन ठप्प होऊन साडेतीन कोटीचे नुकसान झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमएनजीएल कंपनीचे कॉन्ट्रक्टर आणि या कामावर देखरेख ठेवणारे योगेश नानकर यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जसवंत बहादुरसिंह जमादार (४०, रा. वासननगर, पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी नऊ ते शनिवारी (ता. ७) मध्यरात्री एकदरम्यान ही घटना घडली. एमएनजीएल कंपनीची पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना, संबंधित ठिकाणाहून कंपनीची ३३ केव्हीची अंडरग्राऊंड एच. टी. आर्मड केबल गेली असल्याबाबतची पूर्वकल्पना असतानाही नानकर यांनी वीज महावितरणची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही. तसेच सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी न करता बोरिंग व खोदकाम करत ही एक्सप्रेस फिडर लाइन जाणीवपूर्वक दोन वेळा डॅमेज केली. या प्रकारामुळे अंदाजे २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झालेच, शिवाय कंपनीचे उत्पादन पूर्णपणे बंद पडले. यामुळे ३ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाल. यामुळे कंपनीच्या भविष्यातील ग्राहकांच्या ऑर्डर्सवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी फिर्यादीने विचारणा केली असता, नानकर याने शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Decoration Godown Fire : कोल्हापुरात डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; ऐन दिवाळीत फुलेवाडी रिंग रोड परिसरात खळबळ, अग्निशमन दलाचे तीन बंब दाखल

Saudi Arabia Attack : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! राजधानीवर बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; प्रसिद्ध टॉवरचे मोठे नुकसान!

Pune News: शनिवार-रविवार पुण्यातील सिंहगडावर पर्यटकांची मांदियाळी; दोन दिवसांत ४ हजारांहून अधिक जणांची हजेरी

Latest Marathi News Live Update: : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Shambhuraj Desai : "पाच हजार ही केवळ सुरुवात, पूर्ण मदत मिळणार"; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शंभूराज देसाईंचा मोठा दिलासा, सरकार सोबत असल्याचीही दिली ग्वाही

SCROLL FOR NEXT