नाशिक

देवरे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

CD
MSI26B09644 म्हसदी : (स्व.) अण्णासाहेब आर.डी.देवरे कला व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर. -------------- सध्याचे युग स्वत:ला सिद्ध करण्याचे डॉ. महाले : देवरे महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर कार्यशाळा सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. ४ : सध्याचे युग हे गतिमान स्पर्धेचे युग असून, विद्यार्थ्यांनी स्वतःमधील क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षेत स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रभाकर महाले यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन, विस्तार विभाग आणि येथील आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेच्या (स्व.) अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ‘तयारी स्पर्धा परीक्षेची’ या विषयावर प्राचार्य डॉ. महाले बोलत होते. प्राचार्य तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. महाले यांनी स्पर्धा परीक्षेत एकाच लक्षावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी ‘स्पर्धा परीक्षांचे आव्हान’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. हेमंतकुमार पाटील यांनी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेविषयीची मनातील भीती, न्यूनगंड काढून टाकावा, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमातील मूळ संकल्पना समजून घेण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. ‘स्पर्धा परीक्षा दिशा आणि सुरुवात’ या विषयावर साक्री येथील समर्थ ॲकॅडमीचे संचालक प्रा. महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून चिकाटीने सातत्यपूर्ण सराव करावा, असे आवाहन केले. कार्यशाळेत महाविद्यालयातील १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डॉ. ऋषिकेश चित्तम, उपप्राचार्य प्रा. डॉ. वाल्मीक आढावे, शिवाजी हायस्कूलचे पर्यवेक्षक राज देवरे, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. देविदास भामरे उपस्थित होते. प्रा. देविदास भामरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. मिलिंद देवरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. हेमंतकुमार पाटील यांनी आभार मानले.

Raj Thackeray : 'दोनच मागण्या... एसआयआर रद्द करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या!'; राज ठाकरेंचा मुंबईतील मोर्चात हुंकार

Kolhapur Gokul Election : 'गोकुळचे खाजगीकरण करण्यासाठी 200 कोटींची ऑफर आली होती'; सतेज पाटलांच्या वक्तव्याने खळबळ, कोणावर केला गंभीर आरोप?

Employee Code चा ‘हा’ अंक का मानला जातो शुभ? करिअरमध्ये पुढे जाण्याचे मिळतात ‘हे’ संकेत!

Latest Marathi News Live Update : पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर टीका; बडतर्फीची मागणी

Pali Water Crisis: अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत गढूळ व अशुद्ध पाण्याचा पुरवठा; आरोग्य धोक्यात, 25 कोटींची योजना लालफितीत

SCROLL FOR NEXT