hydraulic ladder reference image
hydraulic ladder reference image esakal
नाशिक

Nashik : हायड्रोलिक शिडीची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे

विक्रांत मते

नाशिक : शहरात उंच इमारती तयार होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत ९० मीटर हायड्रोलिक शिडी खरेदी केली जाणार आहे. परंतु, शिडी खरेदी संशयास्पद असल्याचा आरोप यापूर्वी झाला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट तक्रार करण्यात आली आहे. (Complaint about NMC firefighters hydraulic ladder directly to Chief Minister Nashik Latest Marathi News)

नव्वद मीटर लांबीचा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अर्थात शिडी खरेदी करणे बंधनकारक आहे. परंतु, शिडी खरेदी करताना महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहे. त्यानुसारच शिडी खरेदी करणे बंधनकारक आहे. ब्रोटो स्कायलिप्ट ही एकमेव कंपनी नव्वद मीटर शिडी निर्मिती करणारी कंपनी आहे.

या कंपनीने देशभरात युनिट वितरित केले आहे. हायड्रोलिक शिडी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसची परवानगी बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेकडून शिडी खरेदी करताना अननुभवी वितरकांची नियुक्ती केल्याचा आरोप होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

निविदा प्रक्रियेतील तांत्रिक वैशिष्ट्यांमध्ये झालेल्या बदलाबद्दल स्पष्टीकरण मागण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. बदल करण्यात आले आहे का, याबाबत आपण मनपा प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागावे, असे मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शिडी युनिट तयार करण्यासाठी इएन १७७७ हे प्रमाण मानांकन असताना याबद्दल स्पष्टता नाही.

हायड्रोलिक शिडी पुरवठादार कंपनीने जगात पन्नास, तर देशात दहा प्लॅटफॉर्म पुरविण्याची अट असताना हा नियम बदलण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. निविदा उघडण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी दिला जातो, परंतु दोन दिवसातच अग्निशमन विभागाने प्री- बीड सबमिशनची परवानगी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT