Rahul Gandhi esakal
नाशिक

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. स्वप्नील मनोज पांडे (रा. सटाणा) असे संशयिताचे नाव आहे.

राहुल गांधी यांच्याविरुद्ध अतिशय गलिच्छ भाषेत लिहिलेली पोस्टमुळे शहर काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. भद्रकाली पोलिस ठाणे गाठत संशयित तरुणाविरुद्ध काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हनिफ बशीर यांनी तक्रार दाखल केली. संशयितास ताब्यात घेत त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

भद्रकाली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत सायबर क्राईम विभागाच्या माध्यमातून तपास सुरू करण्याचे आश्वासन संतप्त पदाधिकाऱ्यांना दिले. या वेळी शहर काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर, विजय पाटील, ॲड. सागर वाहूळ, अशोक लहामगे, अनिल बहोत, सिद्धार्थ गांगुर्डे, नीतेश निकुंभ, इम्रान अन्सारी, दाऊद शेख, संतोष हिवाळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Details: चार वर्षांत अयोध्येतल्या राम मंदिराला किती दान मिळालं? सोनं आणि पैसा बघून बसेल धक्का!

IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण

Dombivli: राज ठाकरे आणि मराठी माणसांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसे आक्रमक; संबंधिताविरोधात एनसी दाखल

Raigad Drone Row: रायगडावर शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे ड्रोन चित्रीकरण; लौकिक गोळे यांच्यावर आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Omraje Nimbalkar : पवनराजे हत्या प्रकरणाच्या निकालाबाबत उच्च न्यायालयात जाणार

SCROLL FOR NEXT