File Photo esakal
नाशिक

Nashik News: मऱ्हळ येथील ग्रामसेविकाविषयी तक्रारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मऱ्हळ खुर्द (ता. सिन्नर) येथे दैनंदिन कामासाठी ग्रामसेवक उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत.

ग्रामीण भागातील विकासासाठी शासनातर्फे नेहमीच प्राधान्य दिले जाते, त्या दृष्टीने गावातील ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधीदेखील उपलब्ध करून दिला जातो. (Complaints about Village Sevaka in Marhal Nashik News)

ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामसेवक हा महत्त्वाचा मानला जातो. परंतु बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवकांचे ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष होते आणि गावातील नागरिकांना योजनेपासून वंचित राहावे लागते.

असाच एक प्रकार सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ खुर्द-बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे, अशी तक्रार आहे. तेथील ग्रामसेविका काही महिन्यांपासून गावात फिरकलेल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा नाही, ग्रामपंचायत निधीचा व इतर कोणत्याही प्रकारची माहिती नागरिकांना मिळत नाही, योजनांविषयी विचारायला गेल्यावर दमदाटी करतात अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ग्रामस्थांच्या आहेत.

ग्रामस्थांनी अनेक वेळा गटविकास अधिकारी, विस्ताराधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन दखल घेतली जात नाही.

योजनेपासून व कामकाजापासून पूर्ण ग्रामपंचायत वंचित असून, शासनाने तत्काळ लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT