Civil Hospital esakal
नाशिक

Civil Hospital News : आहार घोटाळ्यासंबंधित तक्रारी तथ्यहीन; आरोपाऐवजी खात्री करण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना देण्यात येणाऱ्या सकस आहार पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदार संस्थेने बनावट देयकांच्या आधाराने शासनाची १ कोटी २० लाखांची फसवणुकीची तक्रार तथ्यहीन आहे.

केवळ कंपनीविषयीच्या द्वेषातून हितचिंतकाकडून कपोलकल्पित माहिती दिली गेल्याचा दावा छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्थेने केला आहे.

जिल्हा रुग्णालयातील सकस आहार योजनेचा ठेका छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्थेकडे असताना त्यात, गैरव्यवहार झाल्याच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून ‘सकाळ’मध्ये आज वृत्त प्रसिद्ध झाले. (Complaints food scams unfounded call for confirmation rather than hypothetical accusation Nashik News)

त्या अनुषंगाने आज ठेकेदार संस्थेचे व्यवस्थापक किरण आहेर यांनी तक्रारदारांचे आरोप फेटाळून लावले आहे.

श्री. आहेर यांनी म्हटले आहे, की मुळातच जिल्हा रुग्णालयातील सकस आहार पुरवठ्याचे कामकाज संस्थेकडे नाही. कोरोना काळात साधारण २०१९ ते २०२१ च्या दरम्यान संस्थेकडे सकस आहार पुरवठ्याचे काम होते.

गत आठ महिन्यांपासून नाशिकच्या रुग्णालयाचे कामकाज आमच्याकडे नाही. तसेच आमच्या संस्थेकडे कामकाज असताना त्यासाठीची जी बिल होती ती सगळी नियमानुसारच सादर केली गेली आहे. तसेच, सगळी बिल अचूक आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात तुरळक स्वरूपात त्रुटी असू शकतात. मात्र, बोगस बिल दिल्याचा आरोप मात्र कपोलकल्पित आहे. संस्थेच्या कामकाजाचे सगळे बिल पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. ते कधीही पाहता येऊ शकतात.

संस्थेचे सगळे बिल तपासा असेही संस्थेने म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था २० वर्षाहून अधिक काळापासून कार्यरत असलेली संस्था आहे.

नेटकेपणाने कामकाज करीत राज्यात अनेक ठिकणी संस्थेकडून सेवा पुरविल्या जातात. त्यामुळे स्पर्धक किंवा हितचिंतकाकडून असा प्रयत्न हा संस्थेची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. असाही दावा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT