Congress agitation
Congress agitation esakal
नाशिक

नाशिक : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे ढोल बजाव आंदोलन

दत्ता जाधव

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरांत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. हीच बाब हेरत शुक्रवारी (ता. १) काँग्रेस पक्षातर्फे महात्मा गांधी रोडवरील पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने व ढोल बजाव आंदोलनाने परिसर दणाणून गेला होता. या वेळी महागाईचे प्रतीक म्हणून गॅस सिलिंडर व दुचाकीला हार घालून प्रतिकात्मक निषेध नोंदविण्यात आला.

काँग्रेस पक्षातर्फे चार दिवसीय देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील सर्व भागांप्रमाणेच शुक्रवारी नाशिकमध्येही काँग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध करत जोरदार आंदोलन करण्यात आले.
या वेळी महागाईचे प्रतीक म्हणून गॅस सिलिंडर व दुचाकी वाहनास हार घालून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. या वेळी ढोल बजाव आंदोलनही छेडून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

सर्वसामान्यांचे जगणे अवघड : आहेर

केंद्रातील सत्तारूढ भाजप सरकारने सातत्याने महागाई वाढवत जनतेची लूट सुरू केली आहे. पाच राज्यातील निवडणुकीतील परावभावाच्या भीतीने काँग्रेसने ही वाढ रोखून धरली होती. परंतु या निवडणुका संपताच मोठी वाढ केली असून त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनल्याची प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व शहराध्यक्ष शरद आहेर यांनी नोंदविली. खाद्यतेल व इतर जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरांत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोसळले आहे. त्यातच इंधनाच्या दरांत मोठी वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाल्याचे श्री. आहेर यांनी सांगितले. इंधनाच्या दरांत कपात न झाल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलनाचा इशाराही श्री. आहेर यांनी या वेळी दिला. डॉ. सुधीर तांबे यांनीही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केंद्रांविरोधात लढा तीव्र करण्याचे संकेत दिले.

या आंदोलनात माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, नगरसेविका वत्सला खैरे, माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे, कल्पना पांडे, बबलू खैरे, सेवादलाचे वसंत ठाकूर, सुरेश मारू, अण्णा मोरे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, जय परमार, कैलास कडलग यांच्यासह विविध ब्लॉकचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: दुसऱ्याच षटकात गुजरातला मोठा धक्का; सिराजने बेंगळुरूला मिळवून दिली पहिली विकेट

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT