मेन
--------------
भाजपच्या स्वीकृत सदस्यांवरील काँग्रेसचा पाठिंबा मोडीत
दहाही अर्ज वैध ठरल्याने औपचारिकता बाकी; वादावर पडदा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : छाननी समितीने विभागीय आयुक्तांकडे गटनेत्यांची नोंदणी गृहीत धरल्याने काँग्रेसकडून भाजपच्या स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी दिलेला कागदोपत्री पाठिंबा मोडीत निघाला आहे. भाजपचे सहा, उबाठा व शिवसेनेचे प्रत्येकी दोन असे सर्व दहा अर्ज वैध ठरले असून, महासभेत स्वीकृत सदस्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुफी जीन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सहा आठवड्यात प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विभागीय आयुक्तांकडे शिवसेना (उबाठा) व काँग्रेसची संयुक्त नोंदणी झाली असून शहर विकास आघाडी नामकरण करण्यात आले आहे. परंतु काँग्रेसला स्वीकृत नगरसेवकपद हवे होते; मात्र उबाठाकडून स्वतंत्रपणे हेमंतकुमार गायकवाड व बाबासाहेब गायकवाड यांचे नामनिर्देशनपत्र सादर करण्यात आले. त्यापूर्वी नगरसेवक सुफी यांनी मुंबईत शिवसेना (उबाठा) विरोधात मोर्चेबांधणी केली. भाजपने शहर विकास आघाडीत फूट पाडण्यासाठी व भाजपच्या सहा स्वीकृत व्यतिरिक्त आणखी एक पद पदरात पाडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली. स्वीकृत अर्ज दाखल करण्याच्या ४ नोव्हेंबरच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून अजित चव्हाण, रोहिणी नायडू, हेमंत धात्रक, चंद्रशेखर पंचाक्षरी, नरहरी संभेराव व संदीप लेनकर यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले. सुफी जीन यांनी काँग्रेसकडून भाजपचे सुनील आडके यांना पाठिंबा दर्शविणारे पत्र टपालाद्वारे सादर केल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली. महासभेत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त नीलेश भदाणे, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, लेखा परिक्षक जयंत गायकवाड, लेखाधिकारी दत्तात्रेय पाथरुट, उपायुक्त नितीन नेर, सुवर्णा दखणे यांची समिती गठित केली. समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या गटनेत्यांच्या पत्रानुसारच नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने स्वीकृत सदस्यासाठी नामनिर्देश दाखल झालेल्या उबाठाच्या दोन, भाजपचे सहा व शिवसेनेचे दोन अशा एकूण दहा सदस्यांचे अर्ज छाननीत वैध धरण्यात आले. महासभेत वैध स्वीकृत नगरसेवकांची यादी महापौर हिमगौरी आडके यांच्याकडून घोषित केल्यानंतर अधिकृत नगरसेवक पद ग्राह्य धरले जाणार आहे.
--चौकट
अर्ज आला कुठून
स्वीकृत सदस्यपदासाठी नगरसचिव विभागाकडून तीन गटनेत्यांनाच १० अर्जांचे वाटप करण्यात आले होते. तरीही त्यातील एक अर्ज सुफी जीन यांच्याकडे गेला आणि त्यांनी आडके यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. अधिकृत अर्ज दिला नसतानाही जीन यांच्याकडे अर्ज कुठून आला, याची तपासणी प्रशासनाने करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) गटनेते केशव पोरजे यांनी केली आहे.
---------------------
स्वीकृत सदस्यांची अंतिम यादी
- भाजप - अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, चंद्रशेखर पंचाक्षरी.
- शिवसेना (उबाठा)- हेमंतकुमार गायकवाड, बाबासाहेब गायकवाड.
- शिवसेना - चंद्रकांत लवटे, बाबूराव आढाव.
-----------------------म
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.