नाशिक

खासदार अटकेविरोेधात कॉग्रेसतर्फे ‘काळा दिवस’

CD
सेकंड मेन फोटो : H31685 खासदारांच्या अटकेविरोेधात काँग्रेसतर्फे काळा दिवस आंदोलनातून केंद्र सरकारचा निषेध; जोरदार घोषणाबाजी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ८ : दिल्लीतील जतंरमंतर येथे आंदोलनावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इंडिया आघाडीच्या खासदारांना करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता.८) काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पक्षातर्फे आंदोलन करताना केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसने आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून जंतरमंतर येथे विरोधी पक्षनेते गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या खासदारांनी शांततेच्या मार्गने मोर्चा काढला. पण, बळाचा वापर करून हा मोर्चा अडविण्यात आला. या वेळी बळाचा वापर करताना गांधी यांच्यासह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार प्रियांका गांधी तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांशी पोलिसांनी अमानुष वर्तन केले. या घटनेच्या निषेधार्थ पक्षातर्फे शहरात काळा दिवस पाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला. शहराध्यक्ष नीलेश खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, रमेश जाधव, उल्हास सातभाई, उद्धव पवार, स्वाती जाधव, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे, वृंदा शेरे, गुड्डी आबा, डाॅ. सुचेता बच्छाव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ---चौकट ‘ज्ञानेश कुमार राजीनामा द्या’ आंदोलनकर्ते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या वेळी राजीनामा द्या, राजीनामा द्या ज्ञानेश कुमार राजीनामा द्या, अशी मागणी केली. ज्ञानेश कुमार कहाँ मिंलेगे, बीजेपी के दप्तर मे; वोट चोर कहाँ मिंलेगे, बीजेपी के दप्तर में; वोट चोर, गद्दी छोड; भारतीय संविधानाचा विजय असो; डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आदी घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

Ladki Bahin Yojana Installment Update : लाडक्या बहिणीच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट; 'या' महिलांनाच मिळणार 1500 रुपये? योजनेचा पुढील हप्ता हवा असेल तर लगेच करा 'हे' काम

Latest Marathi News Live Update : सैपन बेगडे यांच्यासह चार जणांचा 'आदर्श पोलीस पाटील' म्हणून गौरव

दिवसाला ६० सिगारेट प्यायचे नाना पाटेकर; 'बहिणीचा 'तो' शब्द अन् नानांनी जागेवर सोडलं धूम्रपान

SCROLL FOR NEXT