नाशिक

कॉग्रेस पत्रकार परिषद

CD
लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन प्रदेश सहप्रभारी बी. एम. संदीप : ‘एसआयआर’मधून मतदार वगळल्याचा आरोप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : देशात सध्‍या सुरू असलेल्‍या ‘एसआयआर’मध्‍ये २० राज्यातील तब्बल १३ काेटी ३० लाख नागरिक मतदार यादीतून वगळण्यात आले आहेत. याच्या माध्यमातून मतचाेरी करून केंद्रातील सरकार लाेकशाही संपविण्याचे काम करीत आहे. लाेकशाही वाचविण्यासाठी काॅंग्रेससह सर्व मित्रपक्षांकडून आंदाेलन उभारले असून १ नाेव्हेंबरला रामलिला मैदानावर भव्य आंदाेलन करण्यात येणार असल्‍याची माहिती काॅंग्रेसचे महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांनी पत्रकार परिषदेत दिली. काॅंग्रेस भवनात आयोजित पत्रपरिषदेस जिल्हाध्यक्ष ॲड.धनंजय चाैधरी, ॲड. अविनाश भालेराव, महानगराध्यक्ष जमील शेख, माजी आमदार शिरीष चाैधरी, सलीम पटेल, उदय पाटील आदी उपस्थित हाेते. संदीप म्हणाले, की संपूर्ण देशात केंद्र सरकारने मतांची चाेरी केली आहे. महाराष्ट्रातही मतांची चाेरी करूनच महायुतीचे सरकार आणले. लाेकसभेत इंडिया आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने काैल दिला. परंतु अवघ्या पाच महिन्यात ३२ लाख मतदार वाढवून या महायुती सरकार सत्तेवर आले. आता एसआयआरच्या माध्यमातूनही माेठ्या प्रमाणात मतदारांना बाहेर काढले जात आहे. यामुळे महाराष्ट्रात २ काेटी ८ हजार मतदारांना मतदार यादीच्या बाहेर काढण्यात आले. तर देशातील २० राज्यात तब्बल १३ काेटी मतदारांना मतदार यादीच्या बाहेर काढण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र माेदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी मतचाेरीचे हे षडयंत्र रचल्‍याचा आरोप देखील त्‍यांनी केला. चौकट देशात हाेत असलेल्या मतचाेरीविरुद्ध काॅंग्रेसह इंडिया आघाडीतर्फे आंदाेलन सुरू आहे. दिल्लीपासून प्रत्येक गावातील ब्लाॅक लेव्हलला हे काम करण्यात येणार आहे. या अंतर्गत मतदार यादीच्या बाहेर काढलेल्या मतदारांना पुन्हा मतदार यादीत जाेडण्यासाठी प्रयत्न केले जातील. या अंतर्गत १ नाेव्हेंबरला रामलीला मैदानावर आंदाेलन केले जाणार असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातून माेठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी हाेणार असल्याचेही सहप्रभारी बी. एम. संदीप सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या डिजिटल मीडिया प्रमुखांचा आढळला मृतदेह; चालत्या ट्रेनमधून झाले होते बेपत्ता

Water Crisis : हक्काचे पाणी उपसले; गावाला शासकीय टँकरची प्रतीक्षा! करजगावच्या पाझर तलावाने गाठला तळ

Latest Marathi News Live Update : पहिल्या फेरीत सेनेच्या किरण सरनाईक यांची आघाडी; काँग्रेसच्या अदिती पोहरे चौथ्या स्थानावर

Pakistan vs Sri Lanka: पाकिस्तानची घरच्या मैदानावर दाणादाण! श्रीलंकेने ११० धावांत गुंडाळलं, मदुशंकाचा पंजा अन् थेट फायनलमध्ये धडक

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

SCROLL FOR NEXT