नाशिक

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

CD
फोटो ः सपकाळ यांचा वापरणे ------------ ३६-४ काँग्रेसविरोधी काम करणाऱ्यांची गय नाही सपकाळांचा नेत्यांना इशारा : ग्रामशाखा उभारणी, वंचितांच्या प्रश्नांवर संघर्ष, संघटनात्मक विस्तारावर भर सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्याचे आणि खरेदी करण्याचे गलिच्छ राजकारण सुरु आहे. त्यांना पक्षातून रसद पुरविणाऱ्या किंवा त्यांच्या डावात सहभागी होऊन पक्षविरोधी कृत्य करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा इशारा देत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसच्या नेत्यांना पक्षसंघटन मजबूत करण्याची सूचना केली. उत्तर महाराष्ट्र विभागातील लोकसभा प्रभारी, विधानसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी आणि जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक गुरुवारी नाशिकमध्ये झाली. काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले, काँग्रेसने आता गावपातळीवर संघटन मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक गावात ग्रामशाखा निर्माण करून पक्षाचा विस्तार केला जाणार आहे. वंचित घटकांच्या प्रश्नांवर संघर्ष उभारण्यासोबतच देशभरात सुरू असलेली आंदोलने गावागावांत पोहोचविणार आहे. संघटनेच्या बळावर सत्ता मिळवणे हेच काँग्रेसचे उद्दिष्ट असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. बैठकीत संघटनात्मक कामकाज, विस्तार आणि आगामी आंदोलनांची दिशा यावर चर्चा झाली. तालुका व जिल्हा कार्यकारिणीचा सध्याचा ढाचा कायम ठेवत ग्रामशाखांच्या माध्यमातून पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या. नाशिकमध्ये झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या शिबिरात राहुल गांधी यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार निश्चित केलेल्या अजेंड्याचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांच्या कामाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात अडथळे आणणे, प्रतिनिधी उशिरा पाठवणे आणि आंदोलने चिरडणे ही भाजपची कार्यपद्धती असल्याची टीका त्यांनी केली. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर सत्याग्रहाच्या माध्यमातून संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार काँग्रेसने या बैठकीत व्यक्त केला. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मुंबईत इमारतीच्या २३व्या मजल्यावर भीषण आग! दिवाळीच्या रॉकेटने आग लागल्याचा संशय

AI Safety: एआयला अधिकार देण्याची घाई करू नका; अन्यथा मोठे संकट अटळ! कोणी दिला धोक्याचा इशारा?

YouTube Tutorials Fake Currency Racket : यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून छापल्या चक्क ६.७८ कोटींच्या बनावट नोटा! नंतर स्वतःच 'पोलीस' बनून लोकांना लुटलं; धक्कादायक प्रकार उघडकीस

Vaibhav Chavan Case news: वैभव चव्हाणला जीवाची भीती होती? मृत्यूपूर्वीच्या दोन ऑडिओ क्लिप्समुळे खळबळ!

Latest Marathi News Update : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT