नाशिक

विद्यार्थ्यांवरील दडपशाहीविरोधात कॉग्रेस आक्रमक

CD
आदिवासी विद्यार्थ्यांची माफी मागा कॉग्रेस आक्रमक : जिल्हा प्रशासनाला निवेदन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ९ : मुंबईत आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारने विद्यार्थ्यांची माफी मागून त्यांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला. यासंदर्भात शुक्रवारी (ता. ९) निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी सुमारे १८० किलोमीटर पायी चालत मुंबईत पोहोचले होते. दादर येथील काँग्रेस कार्यालयात थांबलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनातून मुंबईत फिरवून त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसने केला. आश्रमशाळांमधील सोयीसुविधा, शिष्यवृत्ती, गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना भरपाई आणि आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी या मागण्यांसाठी विद्यार्थी मुंबईत आले होते. विद्यार्थ्यांवरील कारवाईप्रकरणी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, तसेच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसने केली. या वेळी शहराध्यक्ष नीलेश खैरे, रमेश जाधव, पोपटराव धात्रक, ज्ञानेश्वर काळे, जयेश पोकळे, समाधान बागूल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो क्रमांक :- एच-31827

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPच्या आंदोलनापूर्वी गृह मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवी दिल्लीत ४ किमीच्या परिसरात इंटरनेट सेवा बंद

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! देशभरातील 23 राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; मॉन्सूनच्या परतीची सीमा कुठपर्यंत? महाराष्ट्रात वातावरण कसं?

Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

SCROLL FOR NEXT