नाशिक

क्रांतीवीर खोजा नाईक राजाच्या ऐतिहासिक किल्ला संवर्धन व्हावे

CD
फोटो ओळी- 11139 नाशिक : केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांना निवेदन देताना कपिल तेलुरे व शिष्टमंडळ खोजा नाईक राजाच्या किल्ल्याचे संवर्धन करा बिरसा मुंडा आदिवासी मंचाचे मंत्री आठवलेंना निवेदन नांदगाव, ता. ९ ः तालुक्यातील परधडी गावातील क्रांतिवीर खोजा नाईक राजाचा किल्ला सध्या जीर्ण झाला असून, या किल्ल्याचे तातडीने संवर्धन करून त्याचे स्मारकात रूपांतर करावे, अशी मागणी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा आदिवासी मंचाने केली आहे. यासंदर्भात मंचाचे संस्थापक कपिल तेलुरे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. किल्ल्याची सध्याची पडझड व जीर्ण अवस्था स्पष्टपणे दिसून येणारी छायाचित्रेही निवेदनासोबत सादर करण्यात आली. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन किल्ल्याचे संवर्धन व विकास करावा. तसेच येथे खोजा नाईक यांचा पुतळा उभारून स्मारकाचे लोकार्पण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. खोजा नाईकांच्या शौर्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या ऐतिहासिक स्थळाचे जतन होणे गरजेचे असून, शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा मंचाने व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष संजय भालेराव, नाशिक शहराध्यक्ष अर्जुन पगारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवीदास मोरे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पवार, वंदेश गांगुर्डे, पंकज गरुड, राजाभाऊ गुडेकर, आकाश घुसळे, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या आश्रमशाळा कर्मचाऱ्याचा वनविभागाच्या गार्डनमध्ये गळफास घेतलेला मृतदेह आढळला

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT