नाशिक

मुख्य अंकातील पानासाठी...अवतीभवती

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी...अवतीभवती -- संविधान ग्रंथांचे मोफत वाटप धुळे : भारतीय संविधानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, संविधानिक मूल्यांची ओळख व्हावी आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या उदात्त उद्देशाने रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनच्या वतीने संविधान जनजागृती अभियानाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत शहरातील एस.एन.डी.टी. महाविद्यालय, महाराणा प्रताप हायस्कूल आणि जयहिंद हायस्कूल या नामांकित शैक्षणिक संस्थांना भारतीय संविधान ग्रंथांचे मोफत वाटप करण्यात आले. रिअल इंडो ग्लोबलचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. रिअल इंडो ग्लोबलचे अध्यक्ष डॉ. संभाजी पाटील, एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. झेड. चौधरी, महाराणा प्रताप हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. के. डी. अरगडे, जयहिंद हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. व्ही. निकम आदी उपस्थित होते. -- सर्वोदयच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश धुळे : हेंद्रून- मोघन (ता. धुळे) येथील सर्वोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली. जिल्हास्तरीय स्पर्धेत नववी ‘क’चा विद्यार्थी समर्थ किरण पाटील याने अव्वल क्रमांक पटकावला आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच तालुकास्तरीय स्पर्धेत दहावी ‘क’चा विद्यार्थी मनोहर भाऊडू मोरे याने थाळीफेक स्पर्धेत अव्वल क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेचे तिकीट मिळवले. याच स्पर्धेत उच्च उडीमध्ये दहावी ‘क’च्या पवन सुकलाल माळी याने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डी. एन. पाटील यांचे मार्गदर्शन झाले. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा अक्कासाहेब मासरे, सचिव बापूसाहेब मासरे, मुख्याध्यापिका एस. एस. खैरनार, पर्यवेक्षक यू. बी. नवसरे आदींनी कौतुक केले. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

SCROLL FOR NEXT