construction department is preparing to set up 40 Arogyavardhini centers by February 15 nashik news esakal
नाशिक

Nashik News : बांधकाम विभागाकडून 15 फेब्रुवारीपर्यंत 40 आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याची तयारी

प्रजासत्ताक दिनापर्यंत शहरात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याच्या सूचना दिल्यानंतर वैद्यकीय विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : प्रजासत्ताक दिनापर्यंत शहरात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याच्या सूचना दिल्यानंतर वैद्यकीय विभागाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. आता बांधकाम विभागाने १५ फेब्रुवारीपर्यंत शहरात ४० आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याची तयारी केली आहे.

शहरात चार मोठे रुग्णालय आहे, तर दोन प्रसूतिगृह, तर तीस शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहराची वाढत्या लोकसंख्येनुसार वैद्यकीय सेवेचा विस्तार होणे आवश्यक आहे. (construction department is preparing to set up 40 Arogyavardhini centers by February 15 nashik news)

त्याअनुषंगाने महापालिकेने केंद्र सरकारच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात सहभाग घेण्याचा निश्चित करीत १०६ आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चुंचाळे येथे प्रायोगिक तत्त्वावर एक आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले. १०५ आरोग्य केंद्र उभारण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महापालिकेला ३० आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला. त्याअनुषंगाने वैयक्तिक विभागाने तयारी केली. बांधकाम विभागाने आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उभारणीचे काम हाती घेतले.

विविध भागात समाजमंदिरे तसेच महापालिकेच्या मिळकतीमध्ये दुरुस्ती करण्यात सुरवात करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत ४० आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दुसरीकडे वैद्यकीय विभागाने वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

८ एमबीबीएस डॉक्टर, तसेच बीएएमएस डॉक्टरांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या धर्तीवर शहरात १४ ठिकाणी (स्व.) बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

विभागनिहाय केंद्र

सिडको विभागात २२, पंचवटी विभागात २०, नाशिक रोड विभागात १८, पश्चिम विभाग १४, सातपूर विभाग १६, तर पूर्व विभागांमध्ये १६ असे आरोग्यवर्धिनी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT