Felicitation of Kunal Shinde by principal esakal
नाशिक

HSC Result : गवंडी काम करणारा विद्यार्थी जेंव्हा बारावी पास होतो...

गोपाळ शिंदे

घोटी (जि. नाशिक) : कर्मवीर आमदार (स्व.) पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व मोलमजुरी (Labour Work) करत गवंडीकाम करणाऱ्या गरीब घरातील कावनई (ता. इगतपुरी) येथील होतकरू विद्यार्थी कुणाल कारभारी शिंदे याने बारावी (HSC) विज्ञान शाखेतून (Science Stream) ५४ टक्के गुण संपादन करून यश मिळविले. प्राचार्य पी. आर. भाबड, उपप्राचार्य देवीदास गिरी यांनी कुणालचा सत्कार करत पुढील वाटचालीत महाविद्यालय योगदान देईल, असे आश्वासित केले. विशेष म्हणजे कोणताही खासगी क्लासेस (Private Tutions) त्याने लावला नाही. केवळ महाविद्यालयात शिकविलेले अध्ययन हेच खरे करत आपल्या कष्टाला व बुद्धीला झोकून देत तो उत्तीर्ण झाला. (construction labour Kunal Shinde succeeds in science stream HSC result Nashik News)

प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता सुरवातीला मजुरी व नंतर गवंडीकाम अवगत करून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर असतानादेखील महाविद्यालयिन शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडणारा विद्यार्थी हा प्राचार्य व शिक्षकांच्या नजरेतून सुटला नाही. वेळप्रसंगी कुणालला आर्थिक, तसेच मानसिक आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. कुणालला प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी, प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. एस. बी. फाकटकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, संचालक भाऊसाहेब खातळे यांनी अभिनंदन केले.

के.पी.जी. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा एच.एस.सी. बोर्ड परीक्षा (HSC Board examination) मार्च-एप्रिल २०२२ चा शाखेनुसार कला शाखेचा ७३.५० टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.५० आणि विज्ञान शाखेचा ९२.८०, तर एकूण महाविद्यालयाचा ८६.४६ टक्के निकाल लागला. कला शाखेत आकांक्षा प्रकाश काळे (७३), वाणिज्यमध्ये फायमा आसिफ शेख (७८), तर विज्ञान शाखेत सनिक सदाशिव राव व अंजली मदनसिंग सिंग (७३) प्रथम आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT