Students and teachers along with Kishore Jadhav, Pradeep Bhor, Archana Bhor, Praveen Vamne present on the occasion of Vanrai dam construction. esakal
नाशिक

Nashik News : डुबेरेत विद्यार्थ्यांकडून वनराई बंधाऱ्याची निर्मिती; जलसाठा वाढून शेतीला होणार फायदा

सकाळ वृत्तसेवा

डुबेरे (जि. नाशिक) : येथील जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशवंत ग्राम समृद्धी विकास संस्था व कृषी विभागाच्या मदतीने गाव परिसरातील नाल्यांवर वनराई स्वरूपातील पाच बंधारे बांधून वाहून जाणारे पाणी अडविले. बंधाऱ्यामुळे परिसरात लाखो लिटर पाणी अडल्याने परिसरातील जलसाठा वाढवून शेती क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. (Construction of Vanrai dam by students in Dubere Agriculture will benefited by increasing water storage Nashik News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

मविप्र संस्थेच्या डुबेरे उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांनी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या प्रकल्पात सहभाग नोंदविला. या वेळी कृषी विभागाच्या अर्चना भोर, प्रदीप भोर, यशवंत ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वामने यांनी विद्यार्थ्यांना वनराई बंधारे बांधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

प्राचार्य किशोर जाधव यांनी विद्यार्थ्यांना ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या पर्यावरण प्रकल्पाची माहिती देत विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. वाहते पाणी जर आपण जमिनीत मुरविले तर मोठ्या प्रमाणात भूजल साठा वाढून त्याचा फायदा परिसरातील बोरवेल, हातपंप विहिरींना होऊन शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रासाठी फायदा होणार असल्याचे सांगितले.

प्रवीण वामने यांनी विद्यार्थ्यांना बंधाऱ्यांचे महत्त्व सांगितले. प्रदीप भोर यांनी विद्यार्थ्यांना वनराई बंधारे बांधण्याची माहिती दिली. या वेळी पर्यावरण प्रकल्प प्रमुख प्रा. रामदास वारुंगसे, प्रा. सुदाम वारुंगसे, प्रा. संदीप पानसरे, प्रा. सोमनाथ माळी यांनी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT